एचपी करंडक – पुणे रॉयल्स विराग क्रिकेट अकादमीवर सनसनाटी विजय
पुणे : एचपी प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित व महाराष्ट्र क्रिकेट संघटना(एमसीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एचपी करंडक 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत प्रद्युम्न महाजन नाबाद 107धावा)याच्या शतकी खेळीसह ऋषी आग्रहर(5-45)याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुणे रॉयल्स संघाने विराग क्रिकेट अकादमी संघाचा 82 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.
व्हीडीआर येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्यांदा खेळताना पुणे रॉयल्स संघाने 50षटकात 6बाद 320धावा केल्या. यात प्रद्युम्न महाजनने 104 चेंडूत 8चौकार व 5चौकारासह नाबाद 107धावांची खेळी केली. प्रद्युम्नला संज्योत सुतारने 69 चेंडूत 4चौकार व 6षटकारासह नाबाद 88 धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 159चेंडूत 177 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मेहुल पटेल 50, अनंतकुमार शिंदे 31, आकाश जाधव 19 यांनी धावा काढून संघाला मोठे आव्हान उभारून दिले.
320 धावांचे आव्हान विराग क्रिकेट अकादमी संघाला पेलवले नाही. त्यांचा डाव 43.2षटकात 238धावावर संपुष्टात आला. यामध्ये सौरभ दोडके 52, दिपक डांगी नाबाद 34, रोहित खरात 29, निखील जोशी 29 यांनी थोडासा प्रतिकार केला. पुणे रॉयल्स संघाकडून ऋषी आग्रहरने अचूक गोलंदाजी करत 45 धावात 5 गडी बाद केले. ऋषीला मेहुल पटेल(2-31), अविराज गावडे(2-42) यांनी दोन गडी बाद करून चांगली साथ दिली. सामनावीर ऋषी आग्रहर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पुणे रॉयल्स: 50षटकात 6बाद 320धावा(प्रद्युम्न महाजन नाबाद 107(104,8×4,5×4), संज्योत सुतार नाबाद 88(69,4×4,6×6), मेहुल पटेल 50(49,3×4,2×6), अनंतकुमार शिंदे 31(47), आकाश जाधव 19, गौरव गोलहार 2-53, किरण कुमावत 1-37, दीपक डांगी 1-42)वि.वि.विराग क्रिकेट अकादमी: 43.2षटकात सर्वबाद 238धावा(सौरभ दोडके 52(57,6×4,2×6), दिपक डांगी नाबाद 34(31,5×4), रोहित खरात 29, निखील जोशी 29, ऋषी आग्रहर 5-45, मेहुल पटेल 2-31, अविराज गावडे 2-42);सामनावीर-ऋषी आग्रहर; पुणे रॉयल्स संघ 82 धावांनी विजयी.
