Thursday, July 30, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटलांनी घेतला नगरसेवकांचा ‘मास्टरक्लास’

पुणे : महापालिकेत भाजप सत्तेत आल्यानंतर गेल्या साडेचार वर्षात केलेली कामे मतदारांपर्यंत पोचविण्यात कुठेही कमी पडू नका. मेट्रो, पीएमपीची बस खरेदी यासारखी मोठी कामे केवळ आपल्यामुळेच झाली आहेत. महाआघाडीची एकत्र लढण्याची तयारी एका बाजूला सुरू आहे. दुसरीकडे भाजपाने एक‌टयाचा बळावर लढण्याची तयारी सरू केली आहे. भाजपाचे पुण्यात ९९ नगरसेवक आहेत. पुणे महापालिकेच्या इतिहासात एवढे बहुमत कुणालाच कधी मिळाले नव्हते.या सर्व ९९ नगरसेवकांचे दोन दिवसांचे अभ्यास शिबीर सध्या पुण्यात सुरू आहे.  या शिबिरात खासदार गिरीश बापट आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी नगरसेवकांचा ‘मास्टरक्लास’ घेतला. 

महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या पाश्‍र्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपाचे दोन दिवसांचे शबीर याच तयारीचा भाग आहे. 

चालत फिरलात, तर लोक आपुलकीने बोलतात, ओखळतात, हे कधीही विसरू नका’ अशा खास पुणेरी शैलीत खासदार गिरीश बापट यांनी भाजप नगरसेवक आणि महापालिका पदाधिकाऱ्यांना कानपिचक्‍या दिल्या. आपल्या प्रभागात फिरताना कारच्या काचा खाली करून ओळख दाखविण्यापेक्षा प्रत्यक्षात नागरिकांमध्ये दुचाकी घेऊन फिरा. त्यांच्या सूचना-समस्या जाणून घ्या.आता निवडणुकांच्या तोंडावर नगरसेवकांना काम करायचं असून थोडी पिशवी मोकळी करा,’ असा सल्लाही पालिकेतील पदाधिकाऱ्यांना दिला.
आगामी निवडणुकांच्या तोंडावर ‘पक्षाची निवडणूक व्यूहरचना आणि सोशल मीडियाचा वापर’ या विषयावर विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षाकडून नगरसेवकांच्या बैठका घेण्यात आल्या. यावेळी खासदार बापट आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले.सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून पक्षाने केलेली कामे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहचवायला हवीत, त्याचे नियोजन कसे असावे, त्याचा योग्य वापर कसा करावा याबाबतही नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी या दोन्ही नेत्यांनी ‘पक्षातील नगरसेवकांनी नागरिकांमध्ये मिसळावे, त्यांच्याशी संवाद साधावा’ अशा सूचना केल्या. निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर असून कशा पद्धतीने सामोरे जावे त्यासाठी पक्षाची काय भूमिका असेल, याचे मागदर्शन यावेळी करण्यात आले.

शिबीराला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय पुण्याचे खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading