फ्लेचर पटेल आणि समीर वानखेडे यांचा काय संबंध? – नवाब मलिक यांचे पुन्हा NCB वर गंभीर आरोप
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक हे एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. आजही त्यांनी पुन्हा एकदा एनसीबीला काही प्रश्न विचारले आहे. एनसीबीने कारवाई दरम्यान बनवलेला पंच फ्लेचर पटेल कोण आहे? तसेच फ्लेचर पटेलसोबत फोटोत असणारी लेडी डॉन कोण आहे? असे विचारत एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.
नवाब मलिक म्हणाले की, एनसीबीच्या कारवाईत पंचनामा करण्यासाटी स्वतंत्र पंच असलेला फ्लेचर पटेल कोण आहे? त्याचा एनसीबी आणि त्यापैकी एका अधिकाऱ्याशी काय संबंध आहे? एनसीबीने याचा खुलासा करावा. समीर वानखेडे यांच्या पब्लिसिटी ते अनेक कार्यक्रम आयोजित करत आहेत. फ्लेचर पटेल यांच्यासोबत समीर वानखेडे यांचे फोटो काय सांगतात ? फ्लेचर पटेल याच्यासोबत फोटोत असलेली लेडी डॉन कोण आहे? फ्लेचर पटेल त्यांच्यासोबत कुठे-कुठे जातो? मुंबईत कसलं रॅकेट सुरू आहे? फ्लेचर पटेल लेडी डॉनच्या सोबत फिल्म इंडस्ट्रीत काय दहशत निर्माण करत आहेत? इंडस्ट्रीत दहशत निर्माण करुन पैसे उकळण्याचे काम करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मी एनसीबीला सांगतो की एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा करावा.
फ्लेचर पटेल ज्या महिलेसोबत आहे ती एका पक्षाच्या चित्रपट सेनेची कार्यकर्ती आहे. ती वकील सुद्धा आहे. फिल्म इंडस्ट्रीतील बरेच लोक तिच्या कार्यालयात हजेरी लावत आहेत. वानखेडे हे फिल्म इंडस्ट्रीला टार्गेट करत आहेत. जेव्हा माहिती मिळेल तेव्हा या संदर्भातीलही पर्दाफाश करेल असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
मालिक यांनी उपस्थित केलेले प्रश्न?
- पंच फ्लेचर पटेल कोण आहे? तसेच फ्लेचर पटेलसोबत फोटोत असणारी लेडी डॉन कोण आहे?
- छापेमारीच्या कारवायांमध्ये कौटुंबिक मित्रालाच पंच केलं का? पंच म्हणुन जवळची लोक आहेत, या कारवाई मग ठरवून केल्या गेल्या का?
- कोणते रॅकेट मुंबईत चालु आहे, फ्लेचर पटेल लेडी डॉन फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय करतायेत?
- फ्लेचर पटेल आणि लेडी डॉनच्या मदतीने फिल्म इंडस्ट्रीत काय सुरू आहे?
- वानखेडे हे फिल्म इंडस्ट्रीला टार्गेट करतायेत का?
- फ्लेचर पटेल हे एमसीबीने केलेल्या तीन केसेसमध्ये पंच म्हणून उपस्थित आहेत. तीन केसेसमध्ये एकच पंच कसा?
Fletcher Patel seen in this picture with someone who he calls 'My Lady Don'.
Who is this 'Lady Don' ? pic.twitter.com/epTRSopDcH— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 16, 2021