‘गुलाबो सिताबो’ फेम जेष्ठ अभिनेत्री फारुख जफर यांचे निधन

लखनऊ : ज्येष्ठ अभिनेत्री फारुख जफर यांचे शुक्रवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. ‘गुलाबो सिताबो’ हा त्यांचा गाजलेला चित्रपट. ‘उमराव जान’ या हिंदी चित्रपटात त्यांनी रेखाच्या आईची भूमिका केली होती. त्यांच्या निधनाबद्दल चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री फारूख जफर यांना ४ ऑक्टोंबरला त्रास होऊ लागल्यामुळे उपचारासाठी लखनऊच्या सहारा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांची नात शाज अहमदने केलेल्या ट्विटमध्ये दिली आहे.

फारूख जफर यांचा जन्म 1933 मध्ये झाला. 1963 मध्ये त्यांनी विविध भारतीपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. स्वातंत्र्यसैनिक आणि माजी आमदार एस. एम. जाफर यांच्या त्या पत्नी होत्या. १९८१ मध्ये उमराव जान चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी उमराव जान, स्वदेस, पीपली लाइव्ह, गुलाबो सीताबो आदी चित्रपटांमध्ये काम केले. गुलाबो सिताबो या चित्रपटातील फातिमा बेगम ही त्यांची भूमिका खूप गाजली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: