Thursday, September 24, 2026
Latest NewsSportsTOP NEWS

IPL 2021 – धोनीची ‘चेन्नई’ ठरली ‘सुपर किंग्ज’ ; विजेतेपदाचा चौकार

दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या शेवटच्या  सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सने जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव करत  चौथे आयपीएल (IPL0 विजेतेपद जिंकले.  चेन्नईच्या विजयात फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) आणि गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. सीएसकेने (CSK) पहिले फलंदाजी करून 193 धावांचा डोंगर उभारला होता. 

केकेआरने टॉस जिंकून चेन्नईला फलंदाजीला बोलावले, पण तो निर्णय त्यांच्याच अंगलट आला. डु प्लेसिस चे तडाखेबाज अर्धशक आणि मोईन अलीच्या फटकेबाजीच्या बळावर संघाने 192 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तर व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल कोलकातासाठी सलामीला उतरले. या दोघांच्या अर्धशतकी खेळीने केकेआरला दमदार सुरुवात करून दिली. यादरम्यान पहिलंच पर्व खेळणाऱ्या अय्यरने 31 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार खेचत चौथं अर्धशतक ठोकलं. त्यानंतर गिलने जाडेजाच्या 10 व्या षटकात ठोकलेला उत्तुंग चेंडू अंबाती रायडूने पकडलं पण चेंडू मैदानावर असलेल्या स्पायडर कॅमला लागल्याने बॉल अवैध पकडून त्याला नाबाद करार देण्यात आलं आणि त्याला जीवदान मिळालं. केकेआरने उत्तम सुरुवात केल्यानंतर आता मात्र त्यांचे खेळाडू एकामागोमाग एक बाद होत गेले. ठाकूरने अय्यरला बाद करून संघाला सावरलं. त्याच षटकात त्याने नितीश राणाला पहिल्याच चेंडूवर माघारी धाडलं.

पुढच्याच षटकात सुनील नारायणही 2 धावा करुन बाद झाला. नुकतचं अर्धशतक पूर्ण झालेला शुभमन मोठा शॉट खेळताना बाद झाला. दिनेश कार्तिकही खास कमाल करु शकला आणि जडेजाने त्याला 9 धावांवर बाद केलं. जडेजानंतर शाकिब अल हसनला शून्यावर पायचीत करून कोलकाताच्या अडचणीत वाढ केली. यानंतर राहुल त्रिपाठी आणि इयन मॉर्गन देखील सलग ओव्हरमध्ये पॅव्हिलियनमध्ये परतले व चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading