Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुख्यमंत्री ठाकरे यांचे भाषण म्हणजे त्यांनी दसऱ्यालाच शिमगा केला – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या प्रश्नांना हात लावतील असे वाटले होते. महिलांवरील अत्याचार वाढत चालले त्याबद्दल काय करणार सांगतील असे वाटले होते, पण त्यांनी केवळ पुसट उल्लेख केला. महिलांसाठीचा कायदा का पेंडिंग आहे ते सांगितले नाही. शेतकऱ्यांचा आक्रोश चालू त्यावर काय करणार आहे, सांगितले नाही. शेतकऱ्यांना दहा हजार कोटी दिल्याची शेखी मिरवता मग त्याची फोड मांडा, कशाला काय दिले, रस्ते दुरुस्त करणे व धरणे दुरुस्त करण्यास दिले तर त्याचा शेतकऱ्याला काय फायदा
  
महाराष्ट्रात दोन दोन वादळे, अतिवृष्टी, पूर अशी संकटे आली, महिलांवर अत्याचार झाले, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले या पैकी तुम्हाला कशाचे गांभीर्य नाही
 
पंढरपूर आणि आता देगलूरला बाहेरून उमेदवार आणला अशी टीका करता तर तुमची उमेदवारांची यादी वाचा अब्दुल सत्तार कोठून आले, भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा उमेदवार म्हणून पळविला. तो पराभूत झाला. तेथे आम्ही ज्याला निवडून आणले त्याला तुम्ही जागावाटपात जागा घेतल्यानंतर आमचा सिटिंग खासदार घेतला. तुम्ही शिवसेनेच्या 30 – 35 जागांवर भाजपाचे उमेदवार घेतले. गौरव नायकवाडी, कोरेगावचे महेश शिंदे मोठी यादी आहे. जागा सेनेची पण उमेदवार भाजपाचा असे घडले. आम्ही चुकीचे म्हटले नाही.
 
वारंवार बाबरी मशिद पाडण्याचे श्रेय घेता, पण एक तरी शिवसैनिक तेथे होता का, स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, कोणी याची जबाबदारी घेणार नसेल तर मी घेईन. पण राम मंदिराच्या उभारणीसाठीची धग मनामनात कोणी निर्माण केली तर संघाने निर्माण केली,  सार्वभौम राज्य म्हणणे हे धक्कादायक आहे. देशाला सार्वभौमत्व आहे. तुम्ही राज्याला द्यायला लागलात. कोविडमध्ये सर्व काही आपण केले म्हणता लसी, मास्क, पीपीई कीट, व्हेंटिलेटर सर्व काही केंद्राने दिले तुम्ही काय केले तुम्ही पॅकेजपण दिले नाही, कोविडमध्ये तुम्ही काही केले नाही, सर्व केंद्राने केले, 
 
शब्द पाळला नाही म्हणाले, जर एवढी विचारांची चाड असती जर भाजपाने दगा दिला वाटते तर तुम्ही कोणाबरोबरच गेला नसता आणि पुन्हा निवडणुकीची वेळ आणली असती. शेतकऱ्यांच्या समस्या, साखरधंदा अडचणीत, सोयाबीनचे भाव पडले, कर्जमाफी, प्रामाणिक कर्ज फेडणाऱ्यांना मदत या कशावरही बोलले नाहीत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading