खोट्या बातम्या पसरवून बदनाम करण्याचं काम एनसीबी करत आहे – नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

मुंबई : समीर खान यांना एनसीबीने केलेल्या अटक प्रकरणावरून गंभीर आरोप केले. एनसीबीची कारवाई म्हणजे ‘फर्जीवाडा’ आहे, बातम्या पसरवून बदनाम करण्याचं काम एनसीबी करत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 

नवाब मलिक म्हणाले,  केवळ हर्बल तंबाखू सापडलेला असताना माझ्या जावयाकडून गांजा मिळाल्याचा आरोप लावण्यात आला, असा दावा नवाब मलिक यांनी केला. जवळपास २०० किलोचा गांजा कुठेच मिळाला नाही, असं स्पष्टीकरणदेखील त्यांनी दिलं. त्याचबरोबर आता याविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचंदेखील नवाब मलिक म्हणाले. तसेच मला सतत धमकीचे फोन येताहेत, असं विधानही त्यांनी यावेळी केलं. ते म्हणाले, ‘कोणी कितीही बातमी पेरली, तरी सत्यता तपासणं गरजेचं आहे. माझ्या कुटुंबीयांचीदेखील बदनामी झाली.’

दरम्यान, १३ जानेवारी २०२१ रोजी समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. यावर आज पत्रकार परिषदेत ‘माझा जावई समीर खानला २०० किलो ड्रग्ज सापडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तो ड्रग्जचं रॅकेट चालवतो असं सांगण्यात आलं होतं. एनसीबीच्या कारवाईचे फोटो आणि प्रेस रिलीज एसीबीच्या अधिकाऱ्याच्या नंबरवरूनच पाठवण्यात आले होते. मात्र न्यायालयाची ऑर्डर आल्यानंतर त्यामध्ये २०० किलो गांजा सापडलाच नसल्याचं उघड झालं आहे’, असा दावा नवाब मलिक यांनी केला. तसेच, संबंधित अधिकाऱ्याचा फोन नंबरदेखील त्यांनी यावेळी दाखवला.

दरम्यान, या प्रकरणात आम्ही वरच्या न्यायालयात धाव घेतल्याचे संगत एनसीबीचे अधिकारी  समीर वानखेडे यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. 

Leave a Reply

%d bloggers like this: