पुणे शहरामध्ये कोरोनाच्या 123 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून दीडशे च्या खाली आज  रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 103नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 123रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 28हजार  98इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 92हजार 590इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 6रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 4तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 2रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9059जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1259रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 177रुग्ण गंभीर आहेत,  आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 7075 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: