क्षितिजाला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी काँग्रेससह इतर पक्ष व संघाटनाचा कँडल मार्च

पुणे:दोन दिवसापूर्वी पुण्यात बिबवेवाडीमध्ये १४ वर्षीय शाळकरी मुलीचा खून करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी ओळखीच्या नातेवाईकातीलच युवकाने एकतर्फी प्रेमातून क्षितिजाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे.या हत्या करण्याया या आरोपींना अटक करण्यात सुद्धा करण्यात आली.आज काँग्रेस , लोकायत, अभिव्यक्ती, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती, अंगणवाडी कर्मचारी सभा, जनता दल यांच्या कडून आज डीमार्ट, सातारा रोड ते  विवेकानंद पुतळा
कँडल मार्च काढण्यात आला .

या कँडल मार्च वेळी क्षितिजा या मुलीचा हत्या करण्याया आरोपींचा निषेध करण्यात आला. या कँडल मार्च वेळी काँग्रेसच्या सोनाली मारणे,काँग्रेसचे नगसेवक अभय घाजेड,केतन जाधव, अलका जोशी लोकायत अभिव्यक्ती अध्यक्ष, सुनंदा साळवे अंगणवाडी कर्मचारी सभा अध्यक्ष,मोहन वाडेकर, नितीन पवार जनता दल अध्यक्ष, विठल सातव, स्वप्नील पुसे, इतर पक्षाचे व संघाटनेचे  पदाधिकारी व कार्यकर्ते ,तरुण,तरुणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सोनाली मारणे म्हणाल्या,एकतर्फी प्रेमातून मुलीवर ऍसिड फेकणे, बलात्कार करणे आणि खून करणे अशा घटना का वाढत आहेत? समाज कोणत्या दिशेने चालला आहे? प्रेमामध्ये मुलीचा-महिलेचा होकारच असला पाहिजे ही अपेक्षा का? नकार असेल तर पुरुष तिला मारून टाकेल हा विचार का वाढत चालला आहे? महिला म्हणजे पुरुषांची संपत्ती, पुरुष वाट्टेल ते तिच्यासोबत करू शकतो हा पुरुषसत्ताक विचार या घटनांना कारणीभूत आहे. म्हणून आज आम्ही कँडल मार्च काढत आहोत.
अलका जोशी म्हणाल्या,मुबंई येथील साकीनाका येथे पण बलात्कार मुलीवर झाला व पुण्यात पण असा प्रकार घडला आहे.पुरषाची मानसिकता ही भरपूर वाईट प्रवुतिची झाली आहे.या घटना थाबल्या पाहिजेत.महाराष्ट्र सरकारने या घटना रोखल्या पाहिजेत.

Leave a Reply

%d bloggers like this: