जरंडेश्वर साखर कारखानाच्या मालक कोण ? – किरीट सोमय्या यांचा सवाल

पुणे:जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी विक्रीत घोटाळा झालाय हे मुंबई उच्च न्यायालयाने
सांगितलंय  जरंडेश्वर साखर कारखाना चे मुख्य मालक मोहन पाटील आहेत . मोहन पाटील हे अजित पवारांचे मेव्हणे आहेत.
जरंडेश्वर साखर कारखानच्या मालक कोण असा सवाल भाजपचे माजी खासदार  व नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील आयोजीत पत्रकार परिषदेत सवाल उपस्थित केला.

या पत्रकार परिषदेला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, उपमहापौर सुनीता वाडेकर,भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक गणेश घोष, भाजपचे प्रवक्ते संदीप खडेकर व पदाधिकारी उपस्थित होते.


अजित पवारांनी जरंडेश्वर कारखाना बेनामी खरेदी केलाय असा आरोप किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर केला. अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकण्यात आले. तसेच साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. त्यावर किरीट सोमय्या म्हणाले.बहिणीच्या नावे अजित पवारांनी बेनामी संपत्ती तयार केलीय.वअसा किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
अजित पवारांच्या घरावर पडलेली ईडी इन्कम टॅक्सच्या इतिहासातील सर्वात मोठी रेड आहे असेही किरीट सोमय्या म्हणाले. अजित पवारांच्या असलेल्या कंपन्यांनी भ्रष्टाचार केलाय असाही आरोप किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर लगावला.
ठाकरे सरकारच्या मधील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येत आहे. त्या वर किरीट सोमय्या म्हणाले ठाकरे सरकार घोटाळेबाज सरकार असाही आरोप किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकार वर केला. अजित पवारांच्या 27 कंपण्यापर्यंत आमची टीम पोहचली आहे लवकरच आम्ही तपास करून आम्ही सगळ्या समोर घोटाळा बाहेर काढू असे किरीट सोमय्या म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: