अभिनेता, निर्माता अमोल घोडके यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार


कोविड -19 महामारीच्या कठीण काळात अनेक लोकांनी कोविड योद्धा म्हणून विविध प्रकारे देशाची सेवा केली आहे. त्यात अनेक डॉक्टर, सफाई कामगार, मानवतावादी, सामाजिक कार्यकर्ते सामील आहेत. अभिनेता, निर्माता अमोल घोडके हे असेच एक योद्धे आहेत. या कठीण काळात ते सर्व गरजू लोकांसाठी अखंडितपणे काम करत होते. अलीकडेच, दिपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टने अशा कोविड योद्ध्यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात कौतुक चिन्ह देऊन सत्कार केला.

या कार्यक्रमात अमोल घोडके यांना कोविड योद्धा म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते समाजासाठी त्यांच्या निःस्वार्थ योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूप त्यांना ट्रॉफी, सन्मानपत्र (प्रमाणपत्र) आणि ₹ 50,000/- रक्कम प्रदान करण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अमोल घोडके यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना समाजासाठी असेच काम करत राहण्यासाठी प्रेरणा दिली. याप्रसंगी बोलताना राज्यपाल म्हणाले की अमोल घोडके आणि त्यांच्यासारख्या लोकांमुळे कोव्हीड काळात असंख्य लोकांसाठी गोष्टी सुलभ झाल्या. यावेळी अभिनेत्री दिपाली सय्यद ह्यांनी देखील अमोलच्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना अमोल घोडके म्हणाले की, “मला मिळालेल्या प्रेम आणि कौतुकाबद्दल मी खरोखरच सर्वांचा खूप आभारी आहे. यापुढे देखील समाजासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी अधिकाधिक समाजोपयोगी काम भविष्यात करण्याचा माझा प्रयत्न असेल तसेच पुरस्कार रूपाने मिळालेले हे 50,000/- रुपये देखील सामाजिक कार्यासाठी वापरणार आहे.  या कार्यक्रमात के.ई.एम रुग्णालयाचे डॉ.हेमंत देशमुख, नायर रुग्णालयाचे डॉ.रमेश भारमल, कूपर रुग्णालयाचे डॉ.शैलेश मोहिते, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले तसेच आणखी काही मान्यवरांचा देखील गौरव करण्यात आला.

 

Leave a Reply

%d bloggers like this: