दोशी इंजिनियर्स करंडक आंतर क्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत 10 संघ सहभागी

पुणे : पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत 10 संघांना आमंत्रित करण्यात आले आहे.  ही स्पर्धा 14 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत  पीवायसी हिंदू जिमखाना,डेक्कन जिमखाना, क्लब ऑफ महाराष्ट्र, ऍबिशियस, ब्रिलियंटस, डिव्हीसीए व पुना क्लब  मैदानावर होणार आहेत.

पाथ-वे फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत जाधव आणि  सचिव सिद्धार्थ निवसरकर यांनी सांगितले की, या स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना, पुना क्लब, क्लब ऑफ महाराष्ट्र, दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी, कॅडन्स क्रिकेट अकादमी, युनायटेड स्पोर्ट्स, ब्रिलीयंटस स्पोर्ट्स क्लब, मेट्रो क्रिकेट क्लब आणि ऍबिशियस क्लब हे 10 संघ झुंजणार आहेत. ही स्पर्धा साखळी व सुपरलीग पध्दतीने होणार आहे. 10 संघांची  दोन गटांमध्ये प्रत्येकी 4 संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ त्या गटामधल्या प्रत्येक संघाशी एकदा खेळेल. साखळी फेरीचे सामने 14 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. सुपरलीगमधील अव्वल दोन संघांमध्ये उपांत्य फेरीची लढत होणार आहे. 

ते पुढे म्हणाले की, पाथ-वे फाउंडेशनच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे सामने 50 षटकांचे होणार असून स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक देण्यात येणार  आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्ठीरक्षक आणि मालिकावीर यांना देखील आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये नंदन ठाकूर, रोहित खडकीकर, आशुतोष सोमण, कुणाल मराठे यांचा समावेश आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: