Wednesday, July 29, 2026
Latest NewsLIFESTYLE

पुण्यात लिवा मिस डीवा सुप्रानॅशनल 2021ची विजेती रितिका खटनानीचे स्वागत!

पुणे : ग्लॅमर आणि फॅशन उद्योगात आपले खास स्थान स्थापित करणार्‍या युवा प्रतिभावंतांच्या जीवनाचा कायापालट करण्याची परंपरा मिस डीवा सौंदर्यस्पर्धेने आपल्या 9व्या आवृत्तीत देखील चालू ठेवली आहे. या सौंदर्य स्पर्धेचे व्हिजन भविष्यात आपल्या देशाचे नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असलेल्या नवीन पिढीला मनःपूर्वक समर्थन देते.

चंदीगडच्या हरनाज सिंधूने लिवा मिस डीवा युनिव्हर्स 2021 हा किताब जिंकून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे, तर पुण्याच्या रीतिका खटनानीने लिवा मिस डीवा सुप्रानॅशनल 2021 किताब पटकावला. मिस सुप्रानॅशनलमध्ये ती भारताचे प्रतिनिधित्व करेल. 30 सप्टेंबर 2021 रोजी चैतन्याने सळसळणार्‍या रात्री, मुंबईच्या फेमस स्टुडिओमध्ये एका तारकामंडित सोहळ्यात विजेत्यांची नावे जाहीर झाली.

पुण्यात  जन्मलेली रितिका खटनानी एक आत्मविश्वासाने भरलेली, निर्भीड आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेली मुगली असून सध्या ती मुंबईच्या जय हिंद कॉलेजातून मास मीडिया आणि कम्युनिकेशन शिकत आहे. तिसरीत असताना या सौंदर्यवतीची स्पेलिंग बी चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या 15 उमेदवारांमध्ये निवड झाली होती. समाजात योगदान देणार्‍या तिच्या मानवतावादी कार्याचा संयुक्त राष्ट्रसंघाने ग्लोबल यंग फेलोशिप अवॉर्ड देऊन सन्मान केला होता. तिने पुणे महानगरपालिका शाळेत शिकणार्‍या वंचित मुलांना शिकवले आहे.

पुणे येथे योजण्यात आलेल्या एका पत्रकारा परिषदेत लिवा मिस डीवा सुप्रानॅशनल 2021 हा दिमाखदर किताब जिंकल्याच्या आपल्या सिद्धीबद्दल बोलताना रितिका म्हणाली, “हा किताब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ते माझे स्वप्न, ध्येय आणि व्हिजन आहे. मोठे होणे, एक सार्थ आणि उद्देशपूर्ण जीवन जगणे हे माझ्या लेखी फार महत्त्वाचे होते. हे यश केवळ माझे नाही, तर माझ्या आईचेही आहे. विश्व ज्याची प्रतीक्षा करत आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा हा मंच आहे.

आपली आई हा तिचा प्रेरणास्रोत आणि आधारस्तंभ आहे. तिच्यातील मूल्य जाणीव, आत्मविश्वास, निर्भीडपणा आणि दृढनिर्धार हे गुण तिला आईकडूनच वारशात मिळाले आहेत.

आपल्या भविष्याबद्दल ती म्हणते, “अत्यंत कृतज्ञ मनाने मी मला मिळणार्‍या प्रत्येक संधीतील शक्यता शोधत आहे. मन मोकळे ठेवून, मनात महत्त्वाकांक्षा जपत या सुंदर प्रवासावर जाताना स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या मनात निरंतर ध्यास आहे आणि जग जिंकण्याची आग आहे. माझ्या जीवनात आलेला हा समय पुन्हा कधीच परतून येणार नाही, त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला सामोरे जाताना, त्यातून उलगडणार्‍या जादुई क्षणांचा मला आनंद घ्यायचा आहे.”

वंचित आणि HIV पॉझिटिव्ह मुलांना शिकवून त्यांना प्रेमळ, कल्याणकारी आणि सामाजिक स्वीकाराचे वातावरण प्रदान करण्याची तिला इच्छा आहे तसेच, देशातील लैंगिक असमानता कमी करून महिलांना त्यांचे आर्थिक आणि सामाजिक स्थान उंचावण्यासाठीची साधने पुरविण्याचे तिचे लक्ष्य आहे.

रितिका असे मानते की, मोठी स्वप्ने पाहण्याच्या तिच्या क्षमतेमुळे ती मिस डीवा मंचापर्यंत पोहोचू शकली आहे. आपली एक परंपरा निर्माण करण्याची आणि लोक कधीच विसरू शकणार नाहीत असे जीवन जगण्याची तिची आकांक्षा आहे. तिला वाटते की, संधी खूप कमी वेळा आपल्यासमोर येतात त्यामुळे त्या येतात तेव्हा त्यांचे सोने केले पाहिजे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading