fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

Purplle कडून सारा अली खानसोबत PurplleWaliDiwali ची घोषणाः

Purplle.com या भारतातील आघाडीच्या ऑनलाइन सौंदर्य संकेतस्थळाने आज आपल्या सणाच्या कॅम्पेनला- #PurplleWaliDiwali ला सुरूवात केली आहे. आपल्या सर्वांत मोठ्या सौंदर्यप्रसाधनांच्या सेलमध्ये यावेळी प्रथमच ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरवर आपल्या मोफत भेटवस्तूची निवड करण्याची संधी मिळेल. हेअर स्ट्रेटनर्स, आय शॅडो पॅलेट्स, प्रायमर्स, हायलायटर्स, मस्करा आणि इतर अनेक विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने भेटवस्तूच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. Purplle दिवाली सेल २० ते २६ ऑक्टोबरपासून लाइव्ह सुरू होईल आणि सर्वांना त्यांच्या घरापर्यंत सौंदर्यप्रसाधने देऊन या सणांच्या कालावधीचा आनंद द्विगुणित करेल.

या कॅम्पेनमध्ये सारा अली खान ‘ये दिवाली PurplleWali’ गाताना दिसते आहे. ख्यातनाम गायिका अनुष्का मनचंदा यांच्या आवाजात मूळ गाण्याला ट्विस्ट दिला आहे. टीव्ही, प्रिंट, डिजिटल आणि सोशल मीडिया वाहिन्यांवर येणाऱ्या सर्वांगीण मोहिमेत ३००० पेक्षा जास्त प्रभावक या गाण्यावर धुंद होताना आणि या दिवाळीत आपल्यासाठी सर्वोत्तम सौंदर्यप्रसाधने निवडताना दिसतील. त्याचबरोबर ग्राहकांना सारा अली खान हिने जाहिरातीच्या फिल्ममध्ये घातलेला प्रतिष्ठेचा पापा डोंट प्रीच लेहेंगा जिंकण्याचीही संधी मिळेल.

या जाहिरात मोहिमेबाबत बोलताना सारा अली खान म्हणाली की, “Purplle म्हणजे सर्वांसाठी सर्वसमावेशक व सहजसाध्य सौंदर्य होय आणि या दिवाळीत त्यांनी ग्राहकांना आपल्या आवडीची मोफत भेटवस्तू निवडण्यासाठी आणि काही सर्वोत्तम सौंदर्य प्रसाधनांवर दावा करण्यासाठी सक्षम केले आहे. कॅची ट्यून, एक सुंदर हूक स्टेप आणि बॉलीवूडच्या ख्यातनाम गाण्याची पुनर्निर्मिती करून मोहिमेचा केंद्रबिंदू उठावदार करताना मला खूप आनंद झाला. त्यामुळे मुलींनो आता तयार व्हा, तुमच्यासाठी या PurplleWaliDiwaliमध्ये खरेदी करण्याची, बक्षीस मिळवण्याची आणि एखाद्या सौंदर्यवतीप्रमाणे प्रकाशमान होण्याची उत्तम संधी आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading