fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

महिलांसाठी विशेष सहाय्यता कक्षाचे रमेश बागवे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : शिवाजीनगर मतदारसंघात गोखलेनगर जनवाडी येथे दत्ताभाऊ बहिरट व अॅड.राजश्रीताई अडसूळ यांच्या संयुक्त सहकार्याने परिसरातील महिलासांठी विशेष सहाय्यता कक्षाची सुरुवात काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते आज करण्यात आली.

पुणे शहरात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे .त्या पार्श्भुमीवर काँग्रेस पक्षाने अॅड.राजश्रीताई अडसूळ यांच्या पुढाकाराने महिलांसाठी मोफत कायदेविषयक मदत ,अन्याय अत्याचार व पिढीत महिलांना योग्य ते सहकार्य करण्यासाठी महिला सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला आहे.या बरोबरच महिलांच्या आरोग्य विषयक समस्या साठी दर महिन्याला आरोग्य शिबीर ही भरविण्यात येणार आहे.

झोपडपट्टीतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास काँग्रेस पक्ष कायम तत्पर रहाणार आहे .पुणे शहरात गरीब व हातावर पोट असणाऱ्या लोकांचे प्रमाण मोठे आहे .या उपेक्षित लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी या केंद्राची मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.तसेच पुणे शहरात महिलांसाठी अशा सहाय्यता कक्ष स्थापन करणे गरजेचे आहे .असे बोलून त्यांनी अॅड.राजश्रीताई अडसूळ यांच्या संकलपनेचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या .

या उद्घाटन समारंभास माजी मंत्री रमेश बागवे , काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड.अभय छाजेड ,राष्ट्रवादी पक्षाचे नेते माजी स्थायी समिती अध्यक्ष नीलेश निकम ,उमेश वाघ ,दयानंद इरकल ,सचिन धिमते ,सूर्यकांत अडसूळ ,बाबा सय्यद ,अमजद खान ,राजन नायर ,विनोद बांदल ,सचिन इंगळे ,रवी पाटोळे ,बाळासाहेब पाटोळे,रजिया बल्लारी ,सीमा महाडिक ,पौर्णिमा भगत,संगीता रुपटक्के,राजेश्वरी चींचकर, चांदबी शेख ,जयश्री पिल्ले यासह पुणे शहरातील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading