Pune – कोरोनाचे नवीन 115 रुग्ण तर 169 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून दीडशे च्या खाली आज रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 115नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 169रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 26हजार 66इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 92हजार 319इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 8रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 5तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 3रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9056जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1291रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 186रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5390 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
