MTDC कडून पर्यटकांसाठी खास सवलत योजना जाहीर
कोरोना नियंत्रणात आल्याने ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन होणार आहे. त्या अनुषंगाने दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (महाराष्ट्र टुरिझन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) पर्यटकांसाठी खास सवलती जाहीर के ल्या आहेत. दिवाळी सुट्ट्यांमध्ये निसर्गरम्य ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी महामंडळ सज्ज झाले आहे.करोना रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्य सरकारने बहुतांश निर्बंध शिथिल करत पर्यटनस्थळेही पर्यटकांसाठी खुली के ली आहेत.
हिवाळी पर्यटनासाठी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचाऱ्यांना आगाऊ आरक्षणासाठी सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून माजी सैनिक, शारीरिक विकलांग नागरिकांसाठी खास सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. समूह आरक्षणांतर्गत २० पेक्षा जास्त खोल्यांचे आरक्षण के ल्यासही सवलत दिली जात आहे. याशिवाय १ ऑक्टोबरपासून महामंडळाच्या निवासस्थानांवर मोफत न्याहारी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत विवाहासाठीच्या छायाचित्रणाची सोय करण्यात आली आहे. महामंडळाच्या पुणे विभागातील सर्व पर्यटक निवासांचे आरक्षण सुरू असून ६६६345 या संके तस्थळावर ऑनलाइन आरक्षण घेणे सुरू करण्यात आले आहे. आगामी काळातील पर्यटकांचा ओढा लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर करण्यात आल्या असून पर्यटकांसाठी मोफत न्याहारीसह नावीन्यपूर्ण वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर या संकल्पनेंतर्गत काही निवासस्थानांवर वायफाय सुविधा पुरवण्यात येत आहे.
दरम्यान, महामंडळाच्या सर्व निवासस्थानांची वेळोवेळी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून पर्यटक निवासात औषधोपचार उपलब्ध करून दिले आहेत. शरीर तापमान मोजणारी यंत्रणा, जंतुनाशक व्यवस्था, महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्यांच्या खोल्यांमध्ये अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरवण्यात येत आहेत, अशी माहिती महामंडळ पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.
महामंडळाचे संकेतस्थळ नवीन सुविधांसह अद्ययावत करण्यात आले आहे. यापूर्वी ठरावीक दिवसाचे आरक्षण करता येत नव्हते, मात्र आता नवीन संके तस्थळावरून ऐनवेळी देखील खोल्या उपलब्ध असल्यास आरक्षण करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी हिवाळी हंगाम आणि दिवाळीच्या सुट्टीसाठी पर्यटकांकडून आतापासूनच महामंडळाच्या निवासस्थानांमधील खोल्या आरक्षित के ल्या जात आहेत, असेही हरणे यांनी सांगितले.
