महापालिकेतील तिन्ही पक्ष एकत्र लढण्याबाबत निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जावा – एकनाथ शिंदे
पुणे: महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकिमध्ये शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस, व काँग्रेस बरोबर लढणार का याची चर्चा चालू आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेने सोबत एकत्र लढणार का हा शेवटी वरिष्ठ पातळीवर निर्णय होतो. असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यात एका कार्यक्रमात आले असता त्यांना पत्रकारांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, व काँग्रेस एकत्र लढणार का त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जावा.
एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्यावर भाष्य केले. उत्तर प्रदेशातील लखिमपुर येथे एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलांने शेतकऱ्यांना चिरडले म्हणून उद्या महा विकास आघाडीतल्या घटक पक्षांनी उद्या महाराष्ट्र बंद पुकारला आहे त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले झालेली घटना ही दुर्दैवी घटना आहे. म्हणून महा विकास आघाडी ने बंद पुकारला आहे सगळ्यांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे एकनाथ शिंदे म्हणाले.
हडपसर महानगरपालिका ही स्वतंत्र होवी अशी मागणी काही लोक करत होते.त्या वर शिंदे म्हणाले हडपसर महानगरपालिका हे स्वतंत्र करण्याचा अजून कोणता विचार नाही. तसेच गुंठेवारीचा राज्यसरकार ने निर्णय घेतला आहे. गुंठेवारी ची अडचण नक्की दूर केली जाईल. आयुक्तांना सोबत घेऊन मुख्यमत्र्यांसोबत बैठक घेणार.असे एकनाथ शिंदे म्हणाले.
