Wednesday, July 29, 2026
Latest NewsNATIONAL

आसामच्या तुरुंगातील तब्बल 85 कैद्यांना एचआयव्हीची लागण

दिसपूर (आसाम) : आसामच्या तुरुंगात तब्बल 85 कैद्यांचा रिपोर्ट एचआयव्ही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये आसामच्या नगांव केंद्रीय कारागृह आणि विशेष कारागृहातील कैद्यांचा समावेश आहे. एकाच इंजेक्शने ड्रग्स घेतल्यामुळे कैद्यांमध्ये एचआयव्हीचे संक्रमण वाढले असल्याची माहिती येथील आरोग्य विभागाचे प्रधान सचिव अनुराग गोयल यांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसामच्या नगाव केंद्रीय कारागृह आणि विशेष कारागृहात गेल्या महिन्यात तब्बल 85 कैद्यांचा HIV रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नगांव बीपी सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. एलसी नाथ यांनी शुक्रवारी (9 ऑक्टोबर) प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. एकूण एचआयव्हीची लागण झालेल्या 85 कैद्यांपैकी 45 कैदी हे विशेष कारागृहातील आहेत. तर 40 कैदी हे नगांव केंद्रीय कारागृहातील आहेत. हे सर्व कैदी त्यांच्या ड्रग्जच्या व्यसनामुळे संक्रमित झाले आहेत, अशी माहिती डॉ. नाथ यांनी दिली.

दरम्यान, आसाम राज्य एड्स नियंत्रण सोसायटीने जाहीर केलेल्या आकड्यांनुसार 2002 ते 2021 पर्यंत एकूण 20 हजार 85 एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव अनुराग गोयल यांनी दिली आहे. मोरीगाव, नगांव आणि नलबाडी सारख्या जिल्ह्यांमध्ये इंडेक्स टेस्टिंगमुळे एचआयव्हीबाधितांचा आकडा वाढला आहे. जेलमध्ये ड्रग्सचे  इंजेक्शन घेतल्यामुळे कैद्यांमध्ये एचआयव्हीचं संक्रमण वाढलं, अशी माहिती देखील अनुराग गोयल यांनी दिली.

फोटो- संग्रही

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading