Thursday, July 30, 2026
Latest NewsPUNE

धरण 100 टक्के भरल्यामुळे पाटबंधारे विभागाने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या सतर्क राहण्याच्या सूचना

पुणे: पुणे जिल्ह्यात व शहरात दोन ते तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरले असल्यामुळे पाटबंधारे विभागाने संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी विजय पाटील यांनी दिली.

काल संध्याकाळी पाच नंतर रात्री दहा वाजेपर्यंत खडकवासला धरणात जोरदार पाऊस पडला खडकवासला धरणाची साठवण क्षमता 12.94 टीएमसी असून यां धरणात शनिवारी संध्याकाळी पाच वाजता 3.33 टीएमसी म्हणजे 70 टक्के पाणी जमा होते. खडकवासला धरण 100 टक्के भरले असून. धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती विजय पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading