Friday, July 31, 2026
Latest NewsPUNE

भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ ग्रंथावरील वेबिनार मालिकेला चांगला प्रतिसाद

पुणे : ‘अंकनाद ‘ या गणिताची गोडी लावण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अॅप कडून थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ या ग्रंथावर ९ , १० ऑक्टोबर रोजी आयोजित वेबिनार मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला.त्यात गणित संशोधक, अभ्यासक डॉ. सुधाकर आगरकर यांनी ‘ मिश्र व्यवहार ‘ या विषयावर मार्गदर्शन केले.वर्षभर हा वेबिनार उपक्रम चालणार आहे.

भारतीय गणिती वारसा पुढे आणण्याच्या उद्देशाने,आपल्या इतिहासात दडलेलं गणिती वैभव मांडणारा एक अभिनव उपक्रम म्हणून ‘ अंक नाद ‘ अॅपने पुढाकार घेतल्याची माहिती मॅप एपिक कम्युनिकेशन्स् चे संचालक मंदार नामजोशी यांनी दिली.

आद्य गणिती भास्कराचार्य यांच्या लीलावती या महान ग्रंथाच्या विवेचनाच्या माध्यमातून भारताला लाभलेला बुद्धिमत्तेचा वारसा रंजक पद्धतीने उलगडला गेला. आतापर्यंत अंक नादच्या माध्यमातून गणितासंबंधी विविध विषयांवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते,त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. समीर बापट, वैशाली लोखंडे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading