६ जणांना पुराव्याअभावी आम्ही सोडून दिले, NCB चा खुलासा, मात्र नावे सांगण्यास नकार
मुंबई : आम्ही अतिशय प्रोफेशनल एजन्सी असून आम्ही आमचे काम अतिशय काटेकोरपणे करत असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेले आरोप हे निराधार आहेत. आम्ही कॉर्डिलिया क्रूझवरून एकुण १४ जणांना चौकशीसाठी ताब्यात आणले होते. त्यापैकी ८ जणांना आम्ही अटक केली. उर्वरीत ६ जणांना कोणत्याही पुराव्याअभावी आम्ही सोडून दिले असा खुलासा NCB ने आजच्या पत्रकार परिषदेत केला.
नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळत एनसीबीने स्पष्ट केले की, एनसीबीच्या कारवाईत कॉर्डिलिया क्रूझवरून एकुण १४ जणांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आले होते. पण त्यापैकी ६ जणांविरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. तर उर्वरीत ८ जणांकडे पुरावे सापडल्याने त्यांना अटक करण्यात आली. उर्वरीत ८ जणांकडे कोणतेही पुरावे न सापडल्याने त्यांना सोडून देण्यात आल्याचेही एनसीबीने स्पष्ट केले.
आम्ही या प्रकरणात दोन स्वतंत्र साक्षीदारांची मदत घेतली होती. त्यामध्ये किरण गोसावी आणि मनिष भानुशालीचा समावेश होता. पण या क्रूझवरील ऑपरेशनच्या आधी आम्ही कोणालाही भेटलो नसून त्यांना ओळखतही नव्हतो असे एनसीबीने स्पष्ट केले. ज्या पद्धतीने साक्षीदार माहिती देतात त्या आधारावर जबाब नोंद केले जातात. पंचनामे हे वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगळ्या पत्त्यावर झाल्याचेही एनसीबीने स्पष्ट केले. नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना भाजपच्या नेत्यांचे फोन आल्याच्या आरोपावरही एनसीबीने स्पष्टीकरण दिले आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचे फोन तपासण्याची मागणी केली होती. पण यावर खुलासा करताना एनसीबीने स्पष्ट केले की, आम्हाला न्यायालय जसे आदेश देईल त्यानुसार आम्ही यापुढची कारवाई करू असेही एनसीबीने स्पष्ट केले.
फोटो सौजन्य – ANI ट्विटर हँडल
Drugs-on-cruise case | Based on the disclosures by accused persons during custodial interrogation, six followed follow-up seizures have been affected & 10 persons arrested at various places in Mumbai: NCB Deputy DG Gyaneshwar Singh pic.twitter.com/dMRnbYy1oK
— ANI (@ANI) October 9, 2021
