Wednesday, August 5, 2026
Latest NewsPUNE

आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा झंझावात दिसेल – डॉ. निलम गोऱ्हे

पुणे: आगामी  पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून कसे येतील. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत .व ते निवडून आल्यानंतर पुणे शहर कसे सुरक्षित ठेवतील हे आम्ही बघणार आहोत . येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा झंझावात दिसून येईल असे विधानपरिषद उपसभापती व शिवसेनेच्या नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या,  खासदार संजय राऊत , शिवसेनेचे पुण्यातील पदाधिकारी ,पुणे शहर संपर्कप्रमुख सचिन अहिर ,व सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर हे येण्याऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूकित शिवसेनेची रणनीती  कशी ठरवायची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार ठरवतील. पुण्यात काही राजकारणी लोकांनी चुकीचे निर्णय घेतले केले आहेत त्यावर निलम गोऱ्हे म्हणाल्या शिवसेनेकडून त्या लोकांना शिवसेना कधीच माफ करणार नाही असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading