Tuesday, August 4, 2026
Latest NewsPUNE

येरवडा पोलीस स्टेशन येथील जप्त वाहनांच्या बाबतीत नागरिकांना आवाहन

पुणे : येरवडा पोलीस स्टेशन येथे सन 2008 पासून विविध गुन्ह्यांमधील दुचाकी व चारचाकी अशी एकूण 59 वाहने जप्त आहे. या जप्त वाहनांची माहिती पुणे पोलिस वेबसाइट वर प्रसिद्ध केली असून, मूळ वाहनांच्या मालकांनी त्यांची खात्री पटवून सदरची जप्त वाहने ताब्यात घ्यावीत असे आवाहन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी केले आहे.

सन 2008 पासून विविध गुन्ह्यातील दुचाकी, तीनचाकी तसेच चारचाकी जप्त असून सदर वाहनांच्या मूळ मालकांचा वेळोवेळी शोध घेऊन देखील ते मिळून आलेले नाहीत. त्यामुळे येरवडा पोलीस स्टेशन कडून या जप्त वाहनांची माहिती फुल पोलीस संकेतस्थळावर 28 सप्टेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी पुणे पोलीस संकेत स्थळावरील “नागरिकांसाठी” या शीर्षकाखाली “नागरिक विभाग” अंतर्गत “जागरूक नागरिक” या हेड खाली सदर जप्त वाहनांची माहिती पाहून सदर वाहनांची खात्री पटवून तीन महिन्यांच्या आत मूळ कागदपत्रांसह खेरडा पोलीस स्टेशन येथे हजर राहून सदर जप्त वाहने ताब्यात घेण्याची पुढील कायदेशीर कार्यवाही करावी. सदर ज्या जप्त वाहनांचे मूळ मालक मिळून न आल्यास त्या वाहनांची कायदेशीर बाबींची पूर्तता करून लिलाव कार्यवाही करण्यात येणार आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading