ठाकरे सरकार इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे – माधव भांडारी
पुणे : ठाकरे सरकार इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. सरकारने केवळ तात्पुरता अध्यादेश काढून ओबीसी समाजाची दिशाभूल केली आहे. असा आरोप भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष श्री माधव जी भंडारी आणि ओबीसी मोर्चा पुणे शहराध्यक्ष योगेश पिंगळे, नंदकुमार गोसावी, दिनेश रासकर, सुरेश धनगर , स्वाती धनगर, हेमंत लेले, संजय मयेकर आणि शंतनू नारके उपस्थित होते उपस्थित होते.
टिळेकर म्हणाले, न्यायालयात टिकेल आणि ज्याला संविधानात्मक संरक्षण असेल असे आरक्षण मिळवण्यासाठी ओबीसी समाजाने एकत्र येऊन सरकारला असे आरक्षण द्यायला भाग पाडावे लागणार आहे. कारण हे सरकार ओबीसी समाजाबाबत उदासीन आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे राज्य मागास आयोगाची या सरकारने दुर्दशा केली आहे. याचे एकमेव कारण म्हणजे ओबीसी समाज हा आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी एकत्र येऊन संघर्ष करत नाहीये. त्याचाच गैरफायदा हे सरकार घेत आहे.
भांडारी म्हणाले, ओबीसी समजला गृहीत धरले जात आहे. यावेळी जर ओबीसी सामाज एकत्र आला नाही तर ओबीसींचे राजकीय अस्तित्व संपून जाईल आणि सामाजिक अस्तित्व देखील धोक्यात येईल त्यामुळे ओबीसी समाजाने एकत्र यावे यासाठी हे अभियान राबवले जात आहे
राज्य सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय अरक्षणा बाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत आहे त्यामुळे या अभियानांतर्गत ओबीसी समाजासमोर राजकीय अरक्षणाबाबतची वस्तुस्थिती ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीतजास्त ओबीसींना या अभियानात सहभागी व्हायला हवे असे आवाहन या निमित्ताने मी करतो आहे.
हे अभियान जरी भाजपाने आयोजित केले असले तरी हे केवळ पक्षाचे एका पक्षापुरते मर्यादित अभियान नसेल, त्यामुळे सर्व ओबीसी बांधवांनी पक्ष आणि विचारधारा बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र येण्याचे आवाहन भी करतो आहे. या अभियानाचा शुभारंभ देवभूमी आणि संतभूमी असलेल्या पंढरपूर येथे ०९ ऑक्टोबर २०२९ रोजी पांडुरंगाच्या दर्शनाने सुरवात होणार असून हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येणार आहे.
