Wednesday, November 18, 2026
Latest NewsLIFESTYLE

यलो रिबन एनजीओ फेअर  शुक्रवार ८ ऑक्टोबर पासुन पुण्यात

पुणे :  वार्षिक आणि बहुप्रतिक्षित १४ वे  “यलो रिबन एनजीओ फेअर” (वायआरएनएफ) ८ ते ११ ऑक्टोबर पर्यंत पुण्यात होत आहे.  या प्रदर्शनाचे आयोजन क्रिएटीसीटी (पूर्वीचा ईशान्य मॉल), येरवडा, पुणे येथे होत असुन गत वर्षीच्या ऑनलाईन आयोजनानंतर या वर्षी हे एनजीओ फेयर प्रत्यक्ष रूपात पुणेकरांच्या भेटीस आले आहे. या एक्झीबिशनद्वारे पुण्यात उत्सवांच्या खरेदीची सुरुवात होईल. यावर्षी आयोजकांनी सध्याची स्थिती लक्षात घेता सर्व आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.

-या प्रदर्शनाचे आयोजन मुख्यता हवेशीर जागेत, नॉनएसी क्षेत्रात केले गेले आले जिथे भरपूर ताजी हवा आणि मोकळी जागा आहे.

-प्रदर्शनामध्ये जवळपास ३५ स्टॉल्स असतील. सुटसुटीत पद्धतीने नियोजित हे स्टॉल पुरेसे सामाजिक अंतर पाळणाऱ्या नियमांचे पालन करतात.

या वर्षी बरीचशी नाविण्यपुर्ण उत्पादने प्रदर्शित केली गेली आहेत, ज्यात इको फ्रेंडली दिव्यांपासून ते उत्कृष्ट टेराकोटा, सुकामेवा, सेंद्रिय डाळी, सेंद्रिय हळद, मध, सणासुदीची सजावट ते मण्यांचे दागिने, हस्तनिर्मित भेटवस्तूंमध्ये फॅब्रिक्स आणि बरेच काही, या सणासुदीच्या काळात सकुटुंब या प्रदर्शनाला भेट देता येईल.

यावर्षीच्या प्रदर्शनाचे आकर्षण काश्मिरी मल्टी फ्लोरल, तुलसी, नीम अजवाईन, हरियाणातील फोगट बी मधमाश्यांचे शीशम मध . हिमाचल प्रदेशातील मां कामख्या- ड्रायफ्रूट्स, अक्रोड, बदाम, अंजीर, मनुका, हळद, ड्राय प्लम, सफरचंद आणि मॉंगो पावडर घेऊन येत आहे. राम रहीम शी यांच्याकडे सांगली, सेलम, राजापुरी सारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या हळदी आहेत  आहेत. राजस्थानमधील मरुलधारा स्वयंसेवी संस्था अप्लीक्यू आणि अजराक वर्क या आपल्या कारीगरीचे प्रदर्शण करणार आहे.

या व्यतिरिक्त प्रदर्शनात सहभागी एनजीओ विविध प्रकारचे इकोफ्रेंडली दिवे, कंदील, भेटवस्तू, जूट बॅग, होम डेकोर, हँड पाउंड मसाला, लाडू आणि बरेच काही घेऊन आले आहेत.

या वर्षीच्या  एनजीओ फेयरचे उद्घाटन करताना,  ईशान्य फाउंडेशनच्या मॅनेजिंग ट्रस्टी पारुल मेहता  यांनी स्वयंसेवी संस्थांची कलाकुसर ,विविध सामाजिक कार्यांप्रती वचनबद्धता याचे कौतुक केले आणि पुण्याच्या सर्व लोकांना या स्वयंसेवी संस्थांना विशेषतः सध्याच्या काळात पाठिंबा देण्यासाठी आमंत्रित केले . या वर्षाच्या आवृत्ती बद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “या काळात आपण आपल्या घरात प्रकाश आणू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला आनंद या लोकांसोबत साजरा करू”

Leave a Reply