Pune – गेल्या 24 तासात कोरोनाचे नवीन 129 रुग्ण तर 107 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून दीडशे च्या खाली आज रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 129नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 107रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 21हजार 01इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 91हजार 472इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 13रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 8तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 5रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9046 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1583रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 184रुग्ण गंभीर आहेत आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 7567 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
