Saturday, April 4, 2026
BusinessLatest NewsPUNE

Pune – गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या नवरात्रातील गृह महोत्सवाचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांचा हस्ते संपन्न

पुणे : गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या नवरात्रातील गृह महोत्सवाचे उद्घाटन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा हस्ते संपन्न झाले. महोत्सवाचे यंदा सलग ९ वे वर्ष असून ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर अशा काही विशेष योजना सादर करण्यात आल्या आहेत. यामध्ये निवासी जागांबरोबरच व्यावसायिक जागांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या नवरात्रातील गृह महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह  प्रसाद ठाकूर, संचालक, लोकमान्य मल्टी पर्पज कोऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, शिरीष देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलडाणा अर्बन कोऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी,  गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले आणि संचालिका पूनम गोखले आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे शहरातील ९ अत्यंत मोक्याच्या ठिकाणी साकारणाऱ्या निवासी गृहप्रकल्पांमध्ये महोत्सवादरम्यान सदनिका खरेदी केल्यास त्यावर तेथे असलेल्या बाजार भावावर थेट रुपये ९९९ प्रती चौरस फुट इतकी सवलत मिळेल. ही सवलत काही विशेष योजने अंतर्गत दुप्पट करून घेण्याची संधी देखील ग्राहकांना असेल. महोत्वादरम्यान पुण्यातील प्रभात रस्ता, कोथरूड, पटवर्धन बाग, सुभाष नगर अशा लोकप्रिय निवासी भागांमध्ये साकारणाऱ्या गोखले कन्स्ट्रक्शन्सचा विविध गृहप्रकल्पातील सदनिका उपलब्ध असतील. याबरोबरच सिटी प्राईड – कोथरूड समोर सकारात असलेल्या ‘गोखले बिझनेस बे’ या भव्य व्यापारी संकुलात ऑफिस खरेदी केल्यास मोठ्या प्रमाणात सवलत मिळण्याची संधी आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading