Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते महालक्ष्मी मंदिराच्या विद्युतरोषणाईचे उदघाटन

पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात मंदिरावर साकारण्यात आलेल्या विद्युतरोषणाईचे उदघाटन पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाले. यंदा नवरात्र उत्सवानिमित्त पद्ममंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

यावेळी पोलीस आयुक्तांनी  देवीची सपत्नीक आरती देखील केली. ट्रस्टतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल,  विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, नगरसेवक विश्वस्त प्रविण चोरबेले, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते. कोरोना नंतरचा काळ सर्वाना चांगला जावो, अशी प्रार्थना त्यांनी देवीचरणी केली. यावेळी मंदिर परिसरात कार्यरत असलेल्या पोलीस अधिका-यांचा सन्मान गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading