Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

पुणे नवरात्रो महोत्सवात लक्ष्मी मातेस पंचवीस किलो चांदीची साडी अर्पण

पुणेः-कला-संस्कृती,-गायन-वादन याचा मनोहारी संगम असणारा पुणे नवरात्र महोत्सवास आज
गुरुवार दिनांक 7 ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला. आजच्या घटस्थापनेच्या दिवशी पुणे नवरात्र महोत्सवाचे संस्थापक आयोजक व पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल व महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या वतीने लक्ष्मी मातेस 25 किलो चांदीची साडी अर्पण करण्यात आली.

यावेळी पुणे नवरात्र महोत्सवाचे सदस्य रमेश भंडारी, घनश्याम सावंत,नंदकुमार कोंडाळकर आणि कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.महोत्सवाचे यंदाचे 27 वे वर्ष आहे.

पुणे नवरात्रो महोत्सवा अंतर्गत प्रतिवर्षी होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर कोरोना परिस्थितीमुळे मर्यादा येत असल्या तरी प्रतिवर्षी देण्यात येणा-या श्री लक्ष्मी माता जीवन गौरव पुरस्काराचे उद्या घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पत्रकार भवनच्या कमिन्स सभागृहात लक्ष्मी माता जीवन गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम होईल. यंदा बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित डॉ. रेवा नातू आणि निर्मला गोगटे, ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर वेदमूर्ती श्रीकांत दंडवते गुरुजी आणि लावणी लोककलावंत पूनम कुडाळकर यांना श्री लक्ष्मी माता जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. देवीची प्रतिमा, सन्मानचिन्ह, पुस्तक, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहेत.

Leave a Reply