Tuesday, August 4, 2026
Latest NewsPUNE

एआरएआयच्या वतीने आयोजित विद्यार्थी पोस्टर सादरीकरण व तांत्रिक शोधनिबंध स्पर्धेच्या विजेत्यांची नावे घोषित

पुणे  : ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एआरएआयच्या वतीने आणि सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्स (एसएई) इंडिया व आंतराष्ट्रीय यांच्या सहकार्याने नुकतेच १७ व्या सिंम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी २०२१ (एसआयएटी २०२१) या प्रसिद्ध वाहन विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत घेण्यात आलेल्या विद्यार्थी पोस्टर सादरीकरण स्पर्धा व तांत्रिक शोधनिबंध स्पर्धेच्या विजेत्यांची नावे समारोपाच्या कार्यक्रमात घोषित करण्यात आली.

‘रिडिफायनिंग मोबिलिटी फॉर फ्युचर’ ही यावर्षीच्या परिषदेची संकल्पना होती. परिषदेमध्ये एकूण १३० तांत्रिक शोधनिबंध सादर करण्यात आले, ज्यापैकी १९ शोधनिबंध हे आंतरराष्ट्रीय स्तरावरून सहभागी झाले होते. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना पोस्टर सादरीकरण स्पर्धेसाठी देखील पुरस्कार देत गौरविण्यात आले. या स्पर्धेअंतर्गत तांत्रिक शोधनिबंधांसाठी ८ विभाग व विद्यार्थी पोस्टर सादरीकरण स्पर्धेसाठी एकूण ३ विभागात पारितोषिके प्रदान करण्यात आली.

तांत्रिक शोधनिबंध स्पर्धेत इटलीतील ईएसआय गृपच्या मिसीमिलिएनो कॅलोनी यांच्या पेपरला ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पेपर’ म्हणून तर ऑस्ट्रियामधील एव्हीएल एलआयएसटी GmbH च्या  जरनेट  हेजनबिकर  यांच्या शोधनिबंधाला सर्वोत्कृष्ट पेपर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देत सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थी पोस्टर सादरीकरण स्पर्धेत सेफ मोबिलिटी विभागात वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या अर्का पात्रा यांच्या पोस्टरला प्रथम पारितोषिक मिळाले. याच स्पर्धेत स्मार्ट मोबिलिटी विभागात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या अनुज तोटे तर सस्टेनेबल मोबिलिटी विभागात एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या गौतमी चाटी व शिवाजी नवले यांच्या गटाने देखील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.

परिषदेच्या समारोपा प्रसंगी केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी, टाटा मोटर्स लिमिटेडचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी व एआरएआयचे उपाध्यक्ष राजेंद्र पेटकर, एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई, एसआयएटी २०२१ चे संयोजक डॉ. सुकृत ठिपसे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने या स्पर्धेच्या विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली.

तांत्रिक शोधनिबंध स्पर्धा व पोस्टर सादरीकारणचा विस्तृत निकाल पुढील प्रमाणे-

तांत्रिक शोधनिबंध स्पर्धा निकाल

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पेपर – मिसीमिलिएनो कॅलोनी, ( ईएसआय गृप, इटली)
विषय – अ व्हेईकल पास बाय नॉईज प्रेडिक्शन मेथड युझिंग रे ट्रेसिंग विथ डिफ्रॅक्शन टू एक्सटेंड सिम्युलेशन कॅपॅबिलिटीज टू हाय फ्रिक्वेंसीज

बेस्ट पेपर ऑन सेफ्टी –  गिरीकुमार कुमरेश (रॉबर्ट बॉश इंजिनीयरिंग बिझिनेस सोल्युशन्स, भारत)
विषय – एस्टीमेशन ऑफ सोशिओ इकोनॉमिक लॉस ड्यू टू रोड ट्रफिक अॅक्सिडेंट्स डेथ इन इंडिया

बेस्ट पेपर ऑन सिम्युलेशन अॅण्ड मॉडेलिंग – पवन दुव्वुरी (कमिन्स टेक्नीकल सेंटर, भारत)
विषय – इन सिलेंडर व्हॅलिडेशन ऑफ अ मेथड ऑफ मोमेंट्स बेस्ड सूट मॉडेल फॉर डिझेल इंजिन

बेस्ट पेपर ऑन एन्व्हार्नमेंटल पोल्युशन – समीर काळे (अशोका लेलँड, भारत)
विषय – चॅलेंजेस ओव्हरवेल्म्ड टू मीट बीएस ६ एमिशन विथ एसपीएफआय फ्युएल सिस्टिम फॉर हेव्ही ड्युटी सीएनजी इंजिन अॅप्लीकेशन

बेस्ट पेपर ऑन इलेक्ट्रिक मोबिलिटी – हेमंत दशोरा (केपीआयटी टेक्नोलॉजीज लि., भारत)
विषय –  अॅनालिसीस ऑफ हाय स्पीड कॉन्स्टंट पॉवर प्रोफाईल इन अ पीएमएसएम ड्राईव्ह अॅण्ड इम्प्रूव्हमेंटस

बेस्ट पेपर – प्रथम क्रमांक – जरनेट  हेजनबिकर  (एव्हीएल एलआयएसटी GmbH, ऑस्ट्रिया)
विषय – टेलर्ड एडीएएस फंक्शन्स फुलफिलिंग लोकल मार्केट एक्सपेक्टेशन्स – तैमुर सेव्हिंग अप्रोच विदाउट कॉम्प्रमायजिंग दी परफॉर्मन्स क्वालिटी

बेस्ट पेपर – द्वितीय क्रमांक – शिवप्रसाद कोरल्ला (टाटा मोटर्स लि., भारत)
विषय – इंजिनिअरिंग चॅलेंजेस ऑफ अलॉय व्हील रिम for सेफ्टी

बेस्ट पेपर – तृतीय क्रमांक – चैतन्य जोशी (प्राज इंडस्ट्रीज लि., भारत)
विषय – रिइमॅजिनिंग ट्रान्स्पोर्टेशन : बायो मोबिलिटी टीएम

पोस्टर सादरीकरणचा विस्तृत निकाल –

सेफ मोबिलिटी विभाग
प्रथम क्रमांक – अर्का पात्रा (वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी)
द्वितीय क्रमांक – प्रफुल्ल दांडगे ( अभियांत्रीकी महाविद्यालय, पुणे)
तृतीय क्रमांक – मंदार कोडंगे व सम्यक वाघमारे (सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मुंबई)

स्मार्ट मोबिलिटी विभाग
प्रथम क्रमांक – अनुज तोटे (अभियांत्रीकी महाविद्यालय, पुणे)
द्वितीय क्रमांक – अश्विनी कुमार (अभियांत्रीकी महाविद्यालय, पुणे)
तृतीय क्रमांक – हेमवती व शिनिशा ए (अॅकॅडमी ऑफ सायंटीफिक अॅण्ड इनोव्हेटिव्ह रिसर्च अॅण्ड काउंसील ऑफ सायंटीफिक अॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च, कराईकुडी)

सस्टेनेबल मोबिलिटी विभाग –
प्रथम क्रमांक – गौतमी चाटी व शिवाजी नवले (एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, पुणे)
द्वितीय क्रमांक – स्वप्नील चोपडे (वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading