गुलटेकडी येथील दफनभूमी वरील जागेवरील आरक्षण कायम ठेवा अन्यथा मुख्यसभेत आंदोलन करणार – वसंत मोरे
पुणे: मनपा शहर सुधारणा समितीच्या सभासदांनी गुलटेकडी टी.पी.स्कीम अंतीम भुखंड ४४१ या जागेवरील टी.पी. १२५ (दफनभुमी) ही आरक्षणाची जागा आहे. या जागेवर द सोशल वेलफेअर ट्रस्ट ऑफ पुना यांच्या उपयोगात आणण्याकरीता या जागेचा रेसिडेंशीयल /इन्स्टिटयुशनल वापर मिळणेकरीता शहर सुधारणा समितीकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याप्रमाणे मनपाच्या विकास योजना नकाशास त्वरीत मान्यता मिळावी असा ठराव कोणतीही चर्चा न करता शहर सुधारणा समितीत मान्य करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रशासनाने सदर प्रस्तावावर मा.महापालिका आयुक्त यांनी अभिप्राय दयावा असे सुचित करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यकारी अभियंता, बांधकाम विकास विभाग झोन क्र. ५ यांनी आरोग्य प्रमुख, पुणे मनपा यांना दिनांक २०/९/२०२१ रोजी पत्र लिहले आहे.
सदर पत्रामध्ये गुलटेकडी म्युरल ग्राऊंड दफनभूमीचे काम सुरू आहे अगर कसे? याबाबत आपल्या कार्यालयाकडील अभिलेखाप्रमाणे सदर ठिकाणी तपासणी करून ग्राऊंड आहे अगर कसे याबाबत स्वयंस्पष्ट अभिप्राय देण्यात यावा.. त्यानुसार लगेच दिनांक २७/९/२०२१ रोजी या प्रभागातील विभागीय अधिकारी संदीप धेंडे यांनी स्वतः जागा पाहणी केली व जो अहवाल सादर केला आहे. हे संपूर्ण प्रकरण एकंदर संशयास्पद आहे कारण द सोशल वेलफेअर ट्रस्ट ऑफ पुणा या संस्थेने आपल्याकडे जागा मिळणेकरीता कोणतेही पत्र अथवा दिलेले नाही. तरीसुध्दा ज्या सभासदाने हा प्रस्ताव दिला आहे. ते स्थानिक नगरसेवक नसून त्यांनी तो प्रस्ताव का दिला?
शिवाय सदर ठराव दाखल मान्य करण्यात आला असून या मिटिंगचे मिनिटस काढले असता काही सेकंदात कोणत्याही प्रकारची चर्चा न करताच सदर ठराव मान्य करण्यात आला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपणास विनंती वजा ईशारा देण्यात येत आहे की, त्वरीत जागा पाहणी करून या प्रकरणावर एक उच्च पदस्थ अधिकारी यांची समिती नेमण्यात यावी. त्यांच्यामार्फत या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करावी. जागेवर सद्यपरिस्थीतीत काय आहे? याचा लेखी खुलासा करावा. सद्यपरिस्थीतीमध्ये पुणे शहरातील हिंदु, ख्रिश्चन व लिंगायत समाजातील नागरिकांच्या भावानांचा आदर करून याठिकाणी असणारे दफनभूमीचे आरक्षण आहे तसे ठेवण्यात यावे. अन्यथा येणा-या मुख्य सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिला.
