Monday, September 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

लखीमपूर येथील शेतकऱ्यांवर झालेल्या हल्याच्या निषेधार्त 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद

मुंबई : उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्याच्या निषेधार्त महाविकास आघाडीकडून येत्या 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यादिवशी अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व दिवसभर बंद राहिल.  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर याबाबत माध्यमांना माहिती दिली.

जयंत पाटील म्हणाले, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लखीमपूर घटनेतील हिंसाचाराबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.  शेतक-यांवर झालेल्या अमानुष हिंसाचार प्रकरणी सर्व मंत्र्यांनी दोन मिनीटे उभं राहून मृतांना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनाही लखीमपूरला भेट देण्याची परवानगी दिली.  पंजाब आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्रीही राहुल यांच्यासोबत जात आहेत. काँग्रेसचे तीन्ही नेते लखीमपूर खेरीच्या पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading