Wednesday, July 29, 2026
Latest NewsPUNE

श्रीराम पथकातर्फे मध्य वस्तीतील ५५६ नागरिकांचे लसीकरण 

पुणे : बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक, स्व-रूपवर्धिनी, आरोग्य संस्था निरामय, सह्याद्री हॉस्पिटल आणि श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ५५६ नागरिकांचे यशस्वी लसीकरण करण्यात आले.
नवीन मराठी शाळेत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  मुख्याध्यापक एनईएमएसचे प्रीतम जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा नगरचे संघचालक बाळासाहेब पाटोळे,  स्व-रूपवर्धिनीचे कार्यवाह विश्वास कुलकर्णी, श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष  विलास शिगवण उपस्थित होते. श्रीराम पथकातर्फे तेजस साठे, विराज जोशी, राघवेंद्र आचार्य, ओंकार टिळेकर, अश्विन देवळणकर व इतर वादकांनी शिबिराचे नियोजन केले व सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading