मी महाविद्यालयाची तोडफोड केली नाही – शुभम बोराटे
पुणे: मी रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी पुणे येथील महात्मा फुले विद्यालयात टी.वाय बी व्होक पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन या वर्गाच्या 2020- 2021 मध्ये शिकत होतो दिनांक 19 सप्टेंबर पासून न्यूज चैनल आणि माध्यमांमध्ये महाविद्यालयात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात आणि अर्धवट सीसीटीव्ही फुटेज चा आधार घेत माझ्या विरोधात खोट्या बातम्या देण्यात आल्या आहेत त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की मी महाविद्यालयाची तोडफोड करून हातात काठी घेऊन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला . असा आरोप खोटा असल्याचा दावा पत्रकारितेचा विद्यार्थी शुभम बोराटे यांनी केला आहे.
शुभम बोराटे म्हणाले, मी कुणाला मारण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच मी कोणाला कोणताही त्रास दिला नाही. मी केवळ मला न्याय मिळावा म्हणून महाविद्यालयात प्रशासनाची संवाद साधत होतो. याचे सविस्तर पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांचीही काचेच्या दरवाजाला धडक दिली. याला कारण ठरले ते प्राचार्यांचा वेळकाढूपणा व अरेरावीची भाषा मी ऑगस्ट 2019 पासून फी कमी करण्यासाठी दीड महिन्यापासून महाविद्यालयात खेटे घालत होतो परंतु मलाच वेळ काढू पणाची उत्तर दिले जात होती. बुधवारी तर धमकावण्यात आले व मारहाण देखील करण्यात आली. असा आरोप शुभम बोराटे यांनी केला आहे.
रयत शिक्षण संस्थेने मुख्यमंत्री सहायता निधीला दोन कोटी 36 लाख रुपये सप्टेंबर 2019 मधले त्या संस्थेच्या महाविद्यालयात कर्मवीर अण्णांच्या फोटो लावून व क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे नाव वापरून फी कमी करण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण होते हे कितपत योग्य आहे? सीसीटीव्ही फुटेजमध्ये इतर सर्व कॅमेरे सुरू असल्याचे दिसत आहे .मग केवळ सोयीस्कर फुटेजच का प्रसिद्ध करण्यात आले इतर फुटेजच प्राचार्यांनी प्रसिद्ध का केले नाही? तसेच यातील जेथे मला मारहाण झाली त्यांनी तेथील फुटेज का डिलीट करण्यात आले? असे प्रश्न शुभमने उपस्थित केले आहेत.
