fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

भामा आसखेड पुनर्वसन बाधित शेरा काढण्यासाठी शेतकरी आमरण उपोषणांस भाजपा कायदा आघाडी चा जाहिर पाठिंबा

पुणे : हवेली , दौंड व खेड तालुक्यातील भामा आसखेड पुनर्वसन बाधित जमिनीवरील पुनर्वसन शेरे कमी करण्यासाठी 2 आक्टोंबर पासुन आमरण पै संदीपआप्पा भोंडवे सह शेकडो शेतकरी आमरण उपोषणांस पेरणे फाटा येथे बसलेले असुन जिल्हाध्यक्ष ॲड. संजय सावंत पाटील यांच्या मार्फत भारतीय जनता पार्टी कायदा आघाडी च्या वतीने जाहिरपाठिंबा देण्यात आला.

धरण लाभक्षेत्रात येत असलेल्या स्लॅबपात्र जमिनींना सद्य परिस्थितीत धरणातील पाण्याचा लाभ होत नसेल  व भविष्यात ही होणार नसेल तर  त्या जमिनीवरील असलेले पुनर्वसनासाठी राखीव हे शेरे काढण्यात यावेत हा 5 ऑगस्ट 2019 रोजी राज्य शासनाने आदेश जारी केला. वास्तविक पहाता आजपर्यंत ह्या आदेशाची अमंलबजावणी होऊन संपुर्ण राज्यभरातील जमिनीवरील पुनर्वसन शेरे निघायला हवे होते . परंतु सहजासहजी शेतकरी बांधवांच्या मदतीला उभे राहील तर शासन कसले.

या आदेशाचा गैरफायदा प्रशासकीय यंत्रेणेतील काही लोकांनी घेत आपले एजंट पुर्व हवेली भागात सोडले व एकरी अमुक तमुक रक्कम निश्चित करुन काही विशिष्ट गावातीलच प्रस्तावच मंत्रालयात पाठविण्याची तयारी सुरु केली हे षडयंत्र सफल होण्याअगोदर पुन्हा एकदा कृती समितीचे अध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे यांनी शेतकरी बांधवांच्या मदतीचा धावुन जात आंदोलनाचा इशारा दीला होता 2 आक्टोंबर पासुन आमरण उपोषण करण्याचा निश्चय करुन शेकडो शेतकऱ्यांसोबत आंदोलनास पेरणे फाटा हवेली पुणे इकडे बसलेले आहेत.

शेतकरी बांधवांची होणारी लाखो रुपयांची फसवणुक रोखण्यासाठी 5 ऑगस्ट 2019 रोजी निघालेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करुन पुनर्वसनासाठी राखीव हे शेरे कमी करण्यासाठी पेरणे फाटा ता – हवेली येथे पै संदीपआप्पा भोंडवे यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव 2 ऑक्टोबर पासुन आमरण उपोषण सुरु केले आहे. सर्व शेतकरी बांधवांनी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उपस्थित राहिले आहे.
पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी कायदा आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड संजय सावंत पाटील यांच्या वतीने देण्यात आला, रयत शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष तसेच अनेक सामाजिक व राजकीय पक्ष यांनी आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading