टाटा स्काय आणि वेदांतु यांच्यात धोरणात्मक भागिदारीची घोषणा
पुणे : दर्जेदार शिक्षण देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात नेण्यासाठी तसेच टेलिव्हाइज्ड शिक्षण विद्यार्थ्यांना सहज आणि वाजवीपणे उपलब्ध व्हावे यासाठी टाटा स्काय या भारतातील आघाडीच्या कंटेंट वितरक आणि पे टीव्ही प्लॅटफॉर्मने लाइव्ह ऑनलाइन लर्निंग क्षेत्रातील प्रवर्तक वेदांतुच्या सहकार्याने परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादात टाटा स्कायच्या कंटेंट आणि कमर्शियल अधिकारी पल्लवी पुरी, वेदांतुचे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी अरविंद सिंघल, वेदांतुचे मास्टर टीचर्स रोहित गर्ग आणि हिमांशी सिंग सहभागी झाले होते व त्यांनी कशाप्रकारे अशा सेवांच्या माध्यमातून केवळ रिमोटच्या क्लिकद्वारे दर्जेदार शिक्षण उपलब्ध केले जाऊ शकते यावर चर्चा केली.
परिसंवादादरम्यान टाटा स्कायच्या कंटेंट आणि कमर्शियल अधिकारी पल्लवी पुरी म्हणाल्या, या महामारीमुळे विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या शिक्षणावर खूप मोठा परिणाम झाला आहे. ही दरी सांधण्यासाठी आणि कानाकोपऱ्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी टाटा स्कायने टाटा स्काय नीट आणि जेईई तयारी सेवा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना बऱ्याच काळापासून सतावत असलेल्या तीन समस्यांवर मात करण्यासाठी टाटा स्कायने या सेवा लाँच केल्या आहेत – सहजपणे मिळणारे दर्जेदार शिक्षक, असे प्लॅटफॉर्म्स/माध्यमांची उपलब्धता आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे, घरगुती बजेटमध्ये बसणारा वाजवीपणा.

टीव्हीच्या माध्यमातून शैक्षणिक कंटेंटचे वितरण करण्याच्या वेदांतुच्या धोरणाविषयी वेदांतुचे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी अरविंद सिंघल म्हणाले, टाटा स्कायबरोबर करण्यात आलेली भागिदारी धोरणात्मक असून त्याअंतर्गत महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण पुरवण्याचा दोन्ही कंपन्यांचा उद्देश आहे. एक ब्रँड म्हणून आम्ही चौकटीपेक्षा जास्त प्रयत्न करत दर्जेदार शिक्षण सहज आणि वाजवीपणे उपलब्ध करून देत आहोत.
मूल्यवर्धित सेवांच्या श्रेणीत नुकतीच समाविष्ट करण्यात आलेली टाटा स्काय एनईईटी तयारी आणि जेईई तयारी ही सेवा टेस्ट प्रेप फाउंडेशन पक्का करून घेण्यावर तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य क्लास उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट प्रेप फाउंडेशन ४४० पेक्षा जास्त व्हिडिओजच्या माध्यमातून पाहाता येईल. ११वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमात जुलै २०२१ ते फेब्रुवारी २०२२ साठी २१०० पेक्षा जास्त व्हिडिओज समाविष्ट केले जातील. जानेवारी २०२२ पासून सर्वसमावेशक उजळणी सत्राचाही समावेश केला जाणार आहे.
