fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

पुणेकरांना मुसळधार पावसाने झोडपले, घराबाहेर न पाडण्याचे हवामान खात्याचे आवाहन 

पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातले असून राज्यात पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आज (दि. 4) पुणे शहर आणि परिसरात विजांच्या गडगडासह मुसळधार पावसाने पुणेकरांना झोडपून काढले. पुण्यातील बावधन, डेक्कन, कोथरूड, वारजे माळवाडी, सिंहगड परिसर आणि शिवाजीनगर या भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, पुणे महापालिकेच्या वतीने व हवामान खात्याच्या वतीने पाऊस थांबे पर्यंत घराबाहेर न पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पुढील 4 ते 5 दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात तयार झालेलं शाहीन चक्रीवादळ अधिक तीव्र झाल्यामुळं ओमन देशाच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.

दरम्यान, विजांच्या गडगडासह मुसळधार पाऊस पडत असल्यानं नागरिकांनी आपली काळजी घ्यावी. जर आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन पुणे प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. तसेच हवामान खात्याने राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस बरसणार असल्याचं सांगितलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading