Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात  कोरोनाचे नवीन 125 रुग्ण तर 118रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून दीडशे च्या आत आज    रुग्ण सापडले  आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 125नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 118रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 16हजार  28इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 91हजार 066इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 4रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 3तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 1रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9038 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1524रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 219रुग्ण गंभीर आहेत आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5550 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply