fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

रक्तदाब हा इतर रोगांना आकर्षित करणारा आजार – ह्रदयरोग तज्ञ डॉ.ॠतुपर्ण शिंदे

पुणे : धकाधकीचे जीवन आणि कामाचा ताण यामुळे आज तरुणांमध्ये रक्तदाबाच्या समस्येचे प्रमाण वाढत आहे. याचा त्रास व्हायला लागला की तपासणी केली जाते आणि तोपर्यंत हा आजार वाढलेला असतो. अगदी वयवर्षे २०-२२ पासून ते  ८० पर्यंतच्या नागरिकांमध्ये हा आजार दिसून येत आहे. रक्तदाब हा शरीरावर शांतपणे आघात करणारा असून इतर रोगांना आकर्षित करणारा आजार असल्याचे मत प्रख्यात ह्रदयरोग तज्ञ डॉ.ॠतुपर्ण शिंदे यांनी व्यक्त केले. 

सेवा मित्र मंडळ, लायन्स क्लब आॅफ पुणे २१ सेंच्युरी आणि औंध पाषाण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार पेठेतील सरदार कान्होजी आंग्रे शाळेमध्ये आरोग्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मधुमेह तज्ञ डॉ.अश्विनी जोशी यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते डॉ.मिलिंद भोई, डॉ.विजय पोटफोडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष अभय गांधी, अध्यक्ष जितेश शेठ, सेक्रेटरी प्रितम गांधी, माजी प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, मालन देवरे, संतोष देवरे, मंडळाचे अध्यक्ष जगदीश शेटे, शिरीष मोहिते आदी उपस्थित होते. 

डॉ.ॠतुपर्ण शिंदे म्हणाले, आहारात जी गोष्ट जीभेला चांगली लागते, ती ह्रदयाला चांगली नसते. जास्तीचे मीठ हे शरीरासाठी अत्यंत घातक आहे. रक्तदाब व मधुमेह यांपासून दूर राहण्याकरीता दररोज ३० मिनिटे चालण्याचा व्यायाम करणे आवश्यक आहे. मानसिक तणाव हे रक्तदाब वाढविण्याचे कारण असून कोणतीही घटना किंवा समस्या आपण शांतपणे हाताळायला हवी. 
डॉ.अश्विनी जोशी म्हणाल्या, आपण कमीत कमी गरजांवर जगू शकतो, हे कोविडच्या काळात शिकायला मिळाले. मधुमेह आणि स्थूलता या आजच्या काळातील दोन मोठया समस्या आहेत. याला एकत्रितपणे मधूस्थूलता असे म्हटले जाते. आज लठ्ठपणाच्या समस्येने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. आपल्या पोटाचा घेर किती आहे, यावर आजारांचे प्रमाण अवलंबून आहे. त्यामुळे मधुमेहासारखे आजार वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. 

आरोग्य व्याख्यानमालेसोबत मोफत आरोग्य तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मे वाटप शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये ३२७ रुग्णांनी तपासणी केली १७ मोतीबिंदूचे आॅपरेशन करण्यात येणार आहेत. मंडळाचे तन्मय तोडमल, हिमांशू मेहता, अमर लांडे, विक्रांत मोहिते, उमेश कांबळे, सचिन ससाने, गणेश सांगळे, सचिन चव्हाण,अमित देशपांडे, अमय थोपटे, कुणाल जाधव, अभिषेक पायगुडे, अजय पंडित, अ‍ॅड.हेमंत झंझाड, रोहन जाधव यांनी संयोजनात सहभाग घेतला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading