Friday, June 19, 2026
BusinessLatest News

शाश्वत भविष्य आणि स्वच्छ भारत मिशनला पूरक ठरणारे किर्लोस्कर आय-लँड

पुणे: टिकाऊपणाला अधिक प्राधान्य देण्याच्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने, आपल्या नवीन आणि ‘अमर्याद’ अश्या दूरदृष्टीचा परिचय देत किर्लोस्कर ऑइल इंजिन्स (KOEL) ने किर्लोस्कर आय-लँड सादर केले आहे. हे एक पूर्णपणे स्वयंचलित सेंद्रिय कचरा कंपोस्टर आहे जे जैविक तंत्रज्ञान आणि प्रगत अभियांत्रिकी यांचा मेळ साधून घरे आणि व्यावसायिक जागेतून येणाऱ्या सेंद्रीय काचऱ्याला खातामध्ये रूपांतरित करते. लँडफिलमध्ये कचरा टाकणे कमी करणे आणि सरकारी संस्थांवर कचरा-प्रक्रियेचा दबाव कमी करणे हे किर्लोस्कर आय-लँड सादर करण्यामागचे उदिष्ट आहे.

किर्लोस्कर हे भारतातील अग्रगण्य शाश्वत अभियांत्रिकी समाधान प्रदाता आहेत आणि सादर करण्यात आलेली नवीनतम नवकल्पना स्वच्छ आणि हरित भारत निर्माण करण्याच्या सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला पूरक आहे. किर्लोस्करांच्या समृद्ध अभियांत्रिकी कौशल्य आणि उद्योग-अग्रणी सेवा क्षमतेचा  भक्कम पाठबळ असलेल्या या कंपोस्टरची अनेक वैशिष्ट्ये आहेत.  याचा आवाज होत नाही, यातून दुर्गंधी किंवा कुठल्याही प्रकारचा वास येत नाही आणि याची कार्यप्रणाली देखभाल-मुक्त आहे. किर्लोस्कर आय-लँड 25 किलो ते 1,250 किलो मशीनमध्ये उपलब्ध असेल.

“समाजाला आणि देशाला फायदा होईल अशा मिशनचा भाग होण्यास आम्ही उत्सुक आहोत. किर्लोस्कर आय-लँडद्वारे आमचे लक्ष्य निर्जलीकरण आणि सूक्ष्मजीवांवर आधारित सेंद्रिय कंपोस्टिंग तंत्रासह हानिकारक मिथेन वायू निर्मिती लक्षणीयरीत्या कमी करण्याचे आहे. किर्लोस्कर पर्यावरण-अनुकूल पद्धती रुजविण्यासाठी बदल घडवून आणत आहेत जेणेकरून आजच्या तरुणांना-जागतिक नागरिकांना आमच्या ‘आय एम द चेंज’ चळवळीत भाग घेण्यासाठी आम्ही प्रेरित करू शकू. आमचा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्ती आणि संस्था सेंद्रीय कचऱ्याला पोषक तत्वांनी युक्त सॉइल न्यूटरीयंट्स मध्ये रुपांतरित करण्यात आणि त्याला निसर्गात परत मिसळून जाण्यास मदत करू शकते. कोणताही मोठा प्रभाव एका व्यक्तीपासून सुद्धा सुरू होऊ शकतो. ” किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडचे अध्यक्ष अतुल किर्लोस्कर यांनी सांगितले.

किर्लोस्कर आय-लँड ही एकमेव सीएसआयआर (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था परिषद) प्रमाणित सेंद्रिय/ ऑरगॅनिक कंपोस्टर आहे. हे एक कार्यक्षम ग्रीन-लिव्हिंग सोल्यूशन म्हणून कार्य करते ज्याचा ऑपरेटिंग खर्च प्रति व्यक्ती प्रति दिवस 1 रुपयांपेक्षा कमी आहे. याचा अवलंब केवळ पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ नाही तर किफायतशीर देखील आहे. किर्लोस्कर आय-लँडला KOEL च्या मोठ्या डीलर आणि सर्व्हिस नेटवर्कने पाठिंबा दिला आहे,

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading