Thursday, July 30, 2026
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

क्रुजवरील ड्रग्ज पार्टीत किंग खानचा मुलगा आर्यन खानला अटक, बॉलीवूड हादरलं

मुंबई : मुंबईतील एका क्रूझवर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर (Narcotics Control Bureau) एनसीबीनं काल छापा टाकला. या छाप्यात आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दिल्लीतील दोन उद्योगपतींच्या मुलींसाह बॉलीवूडच्या किंग खान शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचा देखील समावेश आहे. आज दुपारी त्याला अटक करण्यात आली. या अटकेमुळे संपूर्ण बॉलीवूड हादरलं आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी (2 ऑक्टोबर) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया नावाच्या एका क्रुजमध्ये ड्रग्ज पार्टी होणार असल्याचे एनसीबीला माहिती मिळाली होती. त्यानुसार काळ रात्री उशिरा एनसीबीने या पार्टीवर छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये दिल्लीतील दोन उद्योगपतींच्या मुलींसाह बॉलीवूडच्या किंग खान शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचा देखील समावेश आहे. या छाप्यात 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकेन, 20 ग्रॅम टॅबलेट्स, 10 ग्रॅम एमडी आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी आज सकाळी याबाबद प्रसारमाध्यमांना अधिकृत माहिती दिली.

ड्रग्ज पार्टीची माहिती ‘या’ने दिली

एनसीबीने काही दिवसांपूर्वी सुशांत सिंग राजपूत चा मित्र कुणाल जानी याला अटक केली होती. जानी हा हॉटेल व्यावसायिक असून अनेक बड्या नेत्यांच्या आणि कलाकारांच्या पार्ट्या याच्या हॉटेलमध्ये होतात. सध्या तो एनसीबीच्या ताब्यात आहे. त्यानेच या ड्रग्ज पार्टीची माहिती दिल्याचे कळते.

मला या पार्टीसाठी व्हिआयपी म्हणून बोलावलं होत 

मला या पार्टीसाठी व्हीआयपी म्हणून बोलावलं होतं. माझ्या नावाचा व चेहऱ्याचा उपयोग करून सगळ्यांना या पार्टीत बोलावलं गेल होतं. ड्रग्ज बद्दल आपल्याला काही माहिती नाही, अशी माहिती आर्यन खान याने दिली असल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितली आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading