Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

धनगर समाजाला आरक्षण दिले नाही तर राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार -अण्णासाहेब डांगे


पुणे: धनगर समाजाला अजूनही राज्य सरकारने मराठा ,ओबीसी समाजा प्रमाने आरक्षण दिले नाही. धनगर समाजाला अजूनही काही ठिकाणी राज्य सरकारने योग्य ते मूलभूत गरजा दिल्या नाहीत. मराठा ,ओबीसी समाजा प्रमाने धनगर समाजाचे इंपिरीकल डेटा मुळे राज्य सरकारने आरक्षण रखडवले आहे.येत्या 8 दिवसात सरकारने धनगर समाजाला जर आरक्षण दिले नाही तर येतील पुढील काळात राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करणार अशी माहिती माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी आज पुण्यात पत्रकाराना दिली.

माजी मंत्री अण्णा साहेब डांगे म्हणाले,आज आमच्या धनगर समाजाची पहिली आरक्षण परिषद पुण्यात पार पडली. आमच्या धनगर  समाजाच्या आरक्षण परिषदेत सर्वाच्या एकमताने येत्या 8 दिवसात  समाजाची एक समिती स्थापन करणार आहोत. त्यासमिती मधून  धनगर समाजाला आरक्षण राज्य सरकार लवकरात लवकर कसे देऊ शकते या साठी
ही समिती प्रयत्न करणार आहे. राज्य सरकारने धनगर समाजातिल तळागाळातील लोकांसाठी त्यांच्या मूलभूत गरजा या लवकरात लवकर द्याव्यात अशी आमची प्रमुख मागणी आहे.
राज्य सरकारने केंद्र सरकारकडे लवकरात लवकर धनगर ओबीसी व मराठा यांच्या प्रमाणे जो राज्य सरकारने इंपिरीकल  डेटा मुळे आरक्षण रखडवले आहे. मराठी ओबीसी व धनगर समाजासह  सगळ्यांना प्रत्येकाच्या मागणीनुसार राज्य सरकारांने आरक्षण द्यावे अशी आम्ही मागणी राज्य सरकारकडे करत आहोत. असे अण्णासाहेब डांगे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading