‘बाबू’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात
‘बाबू’ चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रदर्शित झाल्या पासूनच प्रेक्षकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. रांगड्या शरीराच्या, ऐटीत उभ्या असणाऱ्या अंकित मोहनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. श्री कृपा प्रोडक्शन निर्मित ‘बाबू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे करीत असून या चित्रपटाच्या माध्यमातून ते दिग्दर्शनात उतरत आहेत. या चित्रपटाचे मुंबईमध्ये चित्रीकरण सुरु झाले असून ‘बाबू’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे नक्की. अनेक हिंदी मालिका तसेच मराठी चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेल्या अंकित मोहनसोबत या चित्रपटात नेहा महाजन, रुचिरा जाधव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

