‘जय जवान – जय किसान’चा नारा देऊन लाल बहादूर शास्त्रींनी बळीराजाची प्रतिष्ठा वाढवली – गोपाळदादा तिवारी
पुणे : देशास ‘आत्मनिर्भर व कृषिप्रघान’ बनवण्याकरीताच, देशवासियांना धान्य टंचाई काळांत तत्कालीन पंतप्रधान शास्त्री यांनी आठवड्यातून १ दिवस (सोमवारी) भाता’चा ऊपास करायला लावला व धान्य बाहेरून आयात न करता, देशातील शेतकऱ्यास ऊमेद व प्रेरणा देत ‘अन्नदाता बळीराजा’स प्रेरीत केले व जगात ‘कृषिप्रधान भारताची’ ओळख निर्माण करून ‘जय जवान जय किसान’ चा नारा देऊन शतकऱ्यांस गोरवांकीत केले.. असे ऊदगार राजीव गांधी स्मारक समिती अध्यक्ष काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण प्रसंगी अभिवादन पर काढले.. ‘
राजीव गांधी स्मारक समिती’चे वतीने सुमनांजली वहाण्यात आली… या प्रसंगी राजीव गांधी समितीचे सदस्य व शहर काँग्रेस ऊपाध्यक्ष श्री सुर्यकांत मारणे, रामचंद्र शेडगे, सुधीर काळे, भोला वांजळे, महेश अंबिके, संजय अभंग, सचिन आडेकर, संदीप मोरे, आशिश गुंजाळ, पै शंकर शिर्के, देवराज इंदलकर इ उपस्थित होते..
