Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

महाराष्ट्र माझ्यासाठी रामासारखा; मी भरताच्या भूमिकेत – अ‍ॅड. रमाकांत खलप

पुणे – गोव्यावर महाराष्ट्राचे अनंत उपकार असून महाराष्ट्र हा गोव्याचा थोरला बंधू आहेमहाराष्ट्राच्या सहकार्यामुळे तिळाई नदीचे पाणी उत्तर गोमांतकाला मिळालेशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेडीवायपाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांचे सहकार्य आणि आशीर्वाद आपल्याला मिळाले आहेतरामायणातील राम आणि भरत भेटीचा दाखल देऊन संपूर्ण महाराष्ट्र माझ्यासाठी रामासारखा असून मी भरताच्या भूमिकेत आहेअशी प्रांजळ भावना माजी केंद्रिय कायदे मंत्री आणि गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री ॅडरमाकांत खलप यांनी व्यक्त केली.

ॅडरमाकांत खलप यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त पद्मश्री विखे पाटील फाउंडेशनसंवाद पुणे आणि महाराष्ट्र कला प्रसारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने ॅडखलप यांच्या गौरव समारंभाचे आज आयोजन करण्यात आले होतेसत्काराला उत्तर देताना ते बोलत होतेकार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ॅडखलप यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आलाडीवायपाटील विद्यापीठ पिंपरीचे कुलपती डॉपीडीपाटीलज्येष्ठ पत्रकार मधुकर भावेनिर्मला खलपअशोक विखे पाटीलसचिन ईटकरसुनील महाजन व्यासपीठावर होतेॅडखलप यांच्या पुण्यातील स्नेहिजनांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

ॅडखलप यांच्यामुळे महिलांना राजकीय क्षेत्रात 33 टक्के आरक्षण मिळालेयाचा वक्त्यांनी केलेल्या उल्लेखाचा धागा पकडून जे काम हाती घेतले आहे ते अजून पूर्ण झालेले नाहीपुण्यातून पुन्हा लोकसभेत पाठविले तर ते काम नक्कीच पूर्ण करेनअशी मिश्किल टिप्पणी ॅडखलप यांनी केलीमाझ्या आयुष्याची जडणघडण ही महाराष्ट्रातील साधूसंतांच्या वाङमयातून झाली आहेआईकडून ऐकलेले मराठीतील वाङमय आणि मराठीचे भोक्ते असलेले वडिल यांच्यामुळे मला मराठीची गोडी लागलीगोवा विधासभेतील 40 पैकी 25 आमदार पाठीशी असतानाही मुख्यमंत्रीपद मिळाले नाहीगेल्या दोन निवडणुकांमध्ये लोकसभा निवडणुकीचे तिकिट मिळेल असे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आले पण ते मिळाले नाही या राजकारणातील आठवणींबरोबच भविष्यातील निवडणुकीत तिकिट मिळेल की नाही याची काही कल्पना नसल्याचे ॅडखलप यांनी मनमोकळेपणाने सांगितलेपुण्याने मला आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी दिल्यात्यात सोनपावलाने आलेली स्नुषाही पुण्याचीच आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

बाळासोहब थोरात म्हणालेखलप यांच्या संपर्कात आलेली व्यक्ती त्यांचीच होऊन जातेत्यांची ओळख कधीही पुसट होत नाहीखलप यांच्या वकिलीतील सुरुवातीच्या काळातील काही आठवणी सांगून राजकीय क्षेत्रातील जीवनप्रवासावर त्यांनी प्रकाश टाकलातत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि ॅडखलप यांची भेटगोव्यातील पाणीप्रश्नत्यासाठी महाराष्ट्र राज्याने केलेले सहकार्य आणि त्यात राज्यमंत्री म्हणून देता आलेले योगदान या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.गोव्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॅडखलप यांनी पुन्हा एकदा ताकदीने राजकारणात उभे राहावेअशी अपेक्षा व्यक्त करून दिल्लीतील श्रेष्ठींशी चर्चा करण्याची ग्वाही थोरात यांनी या वेळी दिलीसध्याच्या बदलत्या राजकारणातील मूल्यांवर त्यांनी भाष्य केले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणालेगोवा विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत खलप यांनी पुढाकार घ्यावाज्यामुळे पक्षाला स्थैर्य लाभण्यास त्यांच्या राजकाणातील अनुभवांचा उपयोग होईलखलप यांचे मराठीप्रेमगोवा राज्यासाठी चांगले कार्य करण्याची तळमळ याचे काही दाखले त्यांनी दिलेगोव्यात त्यांना न्याय मिळाला नाही तर दिल्लीतील कारकिर्द अल्पायुषी ठरलीअशी खंत त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक विखे पाटील यांनी केलेउपस्थितांचा सत्कार अशोक विखे पाटीलसचिन ईटकरसुनील महाजन यांनी केलामानपत्राचे वाचन सचिन ईटकर यांनी केलेनिर्मला खलप यांचा सन्मान पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलाॅडखलप यांच्यावरील प्रभाकर ढगे संपादित गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झालेसुनील महाजन यांनी आभार मानलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading