Tuesday, September 29, 2026
ENTERTAINMENTLatest News

मी माझ्या हक्काच्या घरी परत आली आहे – रीना अगरवाल

झी मराठीवर मन उडू उडू झालं ही मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांची मन जिंकत आहे. दिपू आणि इंद्राची जोडी तर गाजतेच आहे पण त्याचसोबत मालिकेतील इतर कलाकार देखील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. अशीच एक व्यक्तिरेखा म्हणजे दिपूची मोठी बहीण सानिका. सैनिकांची भूमिका अभिनेत्री रीना अगरवाल अगदी चोख बजावतेय.
‘मन उडू उडू झालं’ ही रीनाची पहिली मराठी मालिका आहे. याविषयी बोलताना रीना म्हणाली, “‘मन उडू उडू झालं’ ही माझी पहिली मराठी मालिका त्यामुळे मला असं वाटतंय की मी माझ्या मायेच्या, हक्काच्या घरी परत आली आहे. अन् फक्त माझ्याच नव्हे तर मी जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांच्या घरी आली आहे. ज्यांना मी आठवड्यातले सलग ६ दिवस भेटणार आहे आणि त्यांच्याच घरातला एक भाग बनणार आहे. तसेच या मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची छान संधी या निमित्ताने मला मिळाली. हृतासोबत आणि इतर कलाकारांसोबत काम करताना मजा येतेय. सेटवरील वातावरण अगदी हलकं-फुलकं, प्रसन्न आहे असं वाटतंय जणू वर्क फ्रॉम होम च चालू आहे इतक्या छान पद्धतीने सेटवर सर्वांचा वावर असतो.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading