संजय राऊत यांनी ‘ते’ विधान कोणत्या हेतूने केले हे त्यांचे त्यांनाच माहीत – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे: अजितदादा पालकमंत्री आहेत. त्यांच्यासोबत, शरद पवराांसोबत बोलणी करु. आघाडी झालीच तर उत्तमच नाही. तर आपण आहोतच. पण सगळा खेळ खराब होऊन नये म्हणून पुणे मनपावर शिवेसेनेचा भगवा फडकावण्याची वेळ आलीय.असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात एका कार्यक्रमात केले होते .त्यावर राष्ट्रवादी पक्षाकडून कोणी अजून कोणते विधान केले नव्हते. प्रत्येक नेत्याला पक्षाच्या कार्यकर्त्याला खूष करण्यासाठी असे विधान करावे लागतात. पण त्यांनी हे विधान कोणत्या हेतूने केले हे त्यांचे त्यांनाच माहीत. असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत राऊत यांना दिले.
पुणे शहर व जिल्ह्याची कोरोना आढाव बेठक अजित पवार यांनी घेतली.त्यानंतर त्यांनी आज विविध मुद्यावर भाष्य केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत काही शिवसेनेचे नगरसेवक आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढू अशी भूमिका घेत आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले, आम्ही खूप वर्षापासून महानगरपालिका, झेडपी ,निवडणुकीमध्ये आम्ही स्वतंत्र लढलो आहोत. शेवटी प्रत्येकाला आपल्या पक्षाच्या जागा निवडणूक मध्ये जास्त याव्या असे वाटत असते. शेवटी हा निर्णय पक्षाचे प्रमुख नेते व त्या त्या भागातील तेथील प्रमूख ठरवतात त्यामुळे जरी त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तरी तो त्याचा तो स्वतंत्र निर्णय असू शकतो.असेही पवार म्हणाले.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज्य सरकारने तीन प्रभाग रचना हा नवा आदेश काढला आहे.त्यामुळे काही पक्ष नाराज झाले होते तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुण्यातील त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीचा भाजपला फायदा होईल असे विधान केले होते.त्यावर अजित पवार म्हणाले, काहीही फरक पडत नाही .आख्या महाराष्ट्रात तीनच वॉर्ड असणार कितीही वॉर्ड असू देत असेही पवार म्हणाले.
मराठवाडा मध्ये ओला दुष्काळ जाहीर अशी मागणी विरोधाकडून होत आहे पण त्या ठिकाणी काही तालुके पूर्ण बाधित झाले तर काही ठिकाणी पूर्ण तालुके बाधित झाले नाही.आम्ही जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांना सूचना दिल्या आहेत.विमा कंपन्याना सूचना दिल्या आहेत.खूप नुकसान झालं आहे.माहीत घेतोय याबाबत मुख्यमंत्री निंर्णय घेतील .तसेच
जलयुक्त शिवार मध्ये घोटाळा झाला का? हा नवीन मुद्दा उपस्थितीत झाला आहे .यामुळे गरज वाटल्यास चौकशी क्रु असे पवार म्हणाले.
