झोपडपट्टी धारकांच्या न्याय हक्कासाठी विभागीय आयुक्त कार्यालासमोर साखळी उपोषण
पुणे : पिंपरी चिंचवड येथील नेहरूनगर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर येथील रहिवाशांची फसवणूक विविध प्रकारे केल्याच्या निषेधार्थ येथील नागरिक गेल्या 9 दिवसापासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषण करून आंदोलन करीत आहेत .परंतु अजूनही प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलने कर्ते नागरिकांनी केला आहे .
खोटी माहिती देऊन माजी महापौर आणि राजकीय लोकांनी सह्या घेतल्या व बेकायदेशीरपणे लोकांना अंधारात ठेवून चालवलेले पुनवर्सन तत्काळ थांबविण्याची मागणी या वेळी डॉ.आंबेडकर नगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष उमेश बनसोडे यांनी केली आहे.अन्यथा मुंबई मंत्रालय येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला .
या वेळी अर्जुन गायकवाड ,उमेश बनसोडे ,साहेबराव निंब्रगी ,सन्मुख अहीवळे ,सिद्धू पुजारी,मिलिंद बनसोडे ,मौलास नदाफ ,शांताराम मग्रुळ,शिवगंगा पुजारी ,अन्सुबई ख्याले,राजश्री निंबरगी ,सीताबाई बनसोडे यासह झोपडपट्टी धारक गेल्या 9 दिवसापासून आंदोलन करीत आहेत .
