Saturday, April 11, 2026
Latest NewsMAHARASHTRA

राज्यातील सर्व शासकीय-अशासकीय वसतिगृह सुरू करा-रिपब्लिकन विद्यार्थी सेना

औरंगाबाद : राज्यातील कोविड-१९ ची बहुतांश जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आली असून रुग्ण संख्याही आटोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालय सुरू करण्यासाठी सरकारने पाऊले उचलली आहेत. त्यामुळे राज्यसरकारने आता राज्यातील सामाजिक न्याय विभाग,आदिवासी विभाग,कृषी-अकृषिक विद्यापीठ व सर्व शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी-विद्यार्थिनींचे वसतिगृह तसेच सर्व खासगी वसतिगृह सुरू करावीट, अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील निवेदन आज औरंगाबादचे  उपजिल्हाधिकारी मुळे यांना देण्यात आले. यावेळी सचिन निकम,अ‍ॅड.अतुल कांबळे,सम्यक सरपे,अ‍ॅड.तुषार अवचार,गजानन कांबळे,प्रवीण हिवराळे,सागर प्रधान ,सतीश शिंदे आदी उपस्थिती होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading